---Advertisement---

दुर्दैव असं की सचिनचा पहिला सामना होता, तरीही भारतीय पाहू शकले नाहीत

---Advertisement---

३० वर्षांपुर्वी झाली जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. सचिनचे हे पदार्पण १५ नोव्हेंबर १९८९ रोजी नॅशनल स्टेडियम, कराची येथे झाले होते.

त्यानंतर बरोबर २४ वर्षांनी सचिनने क्रिकेटला बाय बाय केले ते १६ नोव्हेंबर २०१३ला. या २४ वर्षांत अनेक चाहत्यांनी सचिनचे सामने हे प्रत्यक्ष मैदानावर किंवा टीव्हीच्या माध्यमातून पाहिले होते.

परंतु ऐकून आश्चर्य होईल की सचिनचा पहिला सामना हा भारतीयांना टेलिव्हीजनवर पहाता आला नाही. विशेष म्हणजे या सामन्याचे रेडियावरही समालोचन करण्यात आले नव्हते.

याला कारण ठरले होत्या त्या ९व्या लोकसभा निवडणुका. भारत जेव्हा पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता तेव्हा या मालिकेत संघ एकूण ४ कसोटी सामने खेळला. यातील सर्व सामने अनिर्णित राहिले ते वेगळंच.

अशा या मालिकेतील पहिले दोन सामने ना दूरदर्शनवर दिसले ना रेडियावर ऐकायला मिळाले. याचे कारण तेव्हा सॅटेलाईट चॅनेलला मान्यता नव्हती. त्यामुळे क्रिकेट पहायचे असेल तर दूरदर्शनशिवाय पर्याय नव्हता. परंतु लोकसभा निवडणुकीमूळे दूरदर्शन तसेच आकाशवाणी निवडणुक कव्हरेजमध्ये व्यस्त होते.

त्यावेळी काँग्रेसला सत्तेतून खाली खेचत देशात जनता दलाचे सरकार आले होते आणि व्हीपी सिंग हे देशाचे ७वे पुर्णवेळ पंतप्रधान झाले होते.

यावेळी निवडणुक ही दोन चरणात अर्थात २२ नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबर या दिवशी झाली होती. तर सचिनचा पदार्पणाचा सामना १५ नोव्हेंबर रोजी होता. हा मालिकेतील पहिलाच सामना होता. परंतु दूरदर्शनने पहिला आणि दुसरा सामना न दाखवण्याचा निर्णय घेतला होता.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---