---Advertisement---

IREvIND। आयपीएलमध्ये फ्लॉप ठरूनही ‘या’ तिघांना मिळू शकते टीम इंडियात संधी, यादीत अविश्वसनीय नावांचा समावेश

On: गुरूवार, जून 2, 2022 11:35 PM
Rishabh-Pant
---Advertisement---

पुढच्या आठवड्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका सुरू होईल. त्यानंतर भारताचा दुसरा संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे, ज्याठिकाणी संघाला दोन टी-२० सामने खेळायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ घोषित केला आहे, पण २६ जूनपासून सुरू होणाऱ्या आयर्लंड दौऱ्यासाठी अद्याप संघाची घोषणा झालेली नाही. आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात अशा काही खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यांनी आयपीएल २०२२मध्ये अपेक्षित प्रदर्शन केले नाहीये. आपण या लेखात अशाच तीन खेळाडूंची माहिती घेऊ.

१. श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आयपीएल २०२२मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. त्याच्यासाठी हा आयपीएल हंगाम खूपच साधारण राहिला. श्रेयस भारताच्या टी-२० संघाचा नियमित फलंदाज आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे.

२. रिषभ पंत
श्रेयस अय्यरप्रमाणेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी (Rishabh Pant) देखील आयपीएल हंगाम चांगला गेला नाहीये. तो यावर्षी आयपीएलमध्ये फलंदाजीत अपयशी ठरताना दिसला आहे. त्याच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सला आयपीएलच्या प्लेऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही, पण तरी देखील त्याला आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळणे जवळपास निश्चित आहे.

३. केएल राहुल
केएल राहुल (KL Rahul) आयपीएल २०२२मधील काही सामन्यांमध्ये चांगला खेळला, पण काही सामन्यांमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरताना दिसला. आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने त्याच्यासाठी आयर्लंडचा हा दौरा महत्वाचा असणार आहे. त्याने जर या दौऱ्यात चांगले प्रदर्शन केले, तर विश्वचषक संघात त्याची जागा दुसरा कोणताही फलंदाज घेऊ शकणार नाही.

दरम्यान, यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्धच्या या टी-२० मालिका महत्वाच्या असणार आहेत. या मालिकांमध्ये खेळाडूंचे प्रदर्शन पाहून विश्वचषकाचा संघ निवडला जाऊ शकतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

Bando Mein Tha Dum। ऑस्ट्रेलियातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारित वेब सीरिजचा ट्रेलर रिलीझ

‘बजरंग बली’ सुरेश रैना! मिस्टर आयपीएलने हाती गदा घेऊन केला वर्कआऊट, Video तुफान व्हायरल

तळागाळापर्यंत टेनिसच्या प्रसारासाठी एमएसएलटीएसोबत पीसीएमसीचा पुढाकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---