---Advertisement---

पृथ्वी शाॅ- श्रेयस अय्यर जोडीचा तुफान डान्स होतो व्हायरल, चाहते म्हणताय गो कोरोनावर धरलाय ठेका

On: मंगळवार, मार्च 17, 2020 10:52 AM
---Advertisement---

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने जगभरात सगळीकडेतच कामकाज बंद पाडले आहे. याचा फटका सर्व क्रिडाक्षेक्षांनाही बसला आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. याबरोबरच आयपीएल फ्रंचायझींनी सराव सत्रही रद्द केली आहेत.

अशात नुकत्याच काही दिवसांपुर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरती एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिल्ली संघाचे फलंदाज श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत दिल्ली फ्रंचायझीने चाहत्यांना एक प्रश्नही विचारला आहे. तो असा की, “या व्हिडिओतील गाणे कोणते आहे?”

यामागचे कारण असे की, पूर्ण व्हिडिओत दोन्ही फलंदाज गाण्यानुसार न नाचता केवळ एकच ऍक्शन करताना दिसत आहेत. तसेच गाण्याचा आवाजही येत नाही.

त्यामुळे दिल्ली फ्रंचायझीच्या या प्रश्नाने चाहत्यांना गाण्याचा विचार करण्यास भाग पाडले . चाहत्यांनीही त्यांना खूप वेगवेगळी उत्तरे दिली आहेत. काही तर असेही म्हणाले की, “ही जोडी ‘गो कोरोना गो’ या गाण्यावरती डान्स करत आहे.”

मुळात हा व्हिडिओ खूप जुना आहे. पण, नक्की केव्हाचा आहे याची पूर्ण माहीती उपलब्ध नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

टॉप ५: या खेळाडूंनी मारले आहेत ६ चेंडूत ६ षटकार

युवराज आधी या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात…

कोरोनाचा फटका टीम इंडियाच्या आयसीसी वनडे क्रमवारीलाही?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---