मुंबई । जुलै महिन्यामध्ये वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेच्या तयारीसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने ५५ खेळाडूंची निवड केली आहे. विशेष बाब म्हणजे निवड केलेल्या खेळाडूंमध्ये चौदा खेळाडू हे अजून अनकॅपड आहेत.
निवड केलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये स्फोटक फलंदाज अॅलेक्स हेल्स आणि विश्वविजेत्या संघातील खेळाडू लियाम प्लंकेट यांना यांची नावे नाहीत. डेव्हिड विली याला निवड समितीने सरावासाठी संधी दिली आहे. निवड करण्यात आलेले खेळाडू एकाच मैदानावर सराव न करता ते काउंटी क्रिकेटच्या मैदानावर आपआपला वैयक्तिक सराव करतील.
नॉटिंघम येथील सलामीचा फलंदाज ऍलेक्स हेल्स हा मादक द्रव्य पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्याला मागील विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. हेल्स यांच्या विषयी बोलताना एकदिवसीय संघाचा कर्णधार इयान मॉर्गन म्हणाला, हेल्सला टीमचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी अजून वेळ लागणार आहे.
३५ वर्षीय वेगवान गोलंदाज प्लंकेट हा न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकात अंतिम सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने तीन विकेट घेत न्यूझीलंड संघाला बॅकफूटवर ढकलले होते.
त्यानंतर इंग्लंडकडून अद्याप एकही सामना खेळला नाही. क्रिकेटच्या आगामी मालिकेच्या सरावासाठी त्यालाही निवडण्यात आले नाही.
हेल्स आणि प्लंकेट या दोन्ही हे दोन्ही मॅचविनर खेळाडू आहेत इंग्लंडला अनेक सामने त्यांनी एकहाती जिंकून दिले आहेत.
हेल्सचा एकदिवसीय आणि टी ट्वेंटी प्रकारातील रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याने ६० चेंडूत शतक ठोकण्याची कामगिरी देखील केली होती, तरीही त्याला संघात पुनरागमनासाठी संधी देण्यात आली नाही .
प्रेक्षकांविना होणार मालिका
जुलै महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध होणारी तीन कसोटी सामन्यांची मालिका ही प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे. इंग्लंडला वेस्ट इंडिज, पाकिस्तान, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियात या संघांविरोधात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.