---Advertisement---

साहाचं ठरलंय! सध्याच्या संघाला जय महाराष्ट्र म्हणत ‘या’ संघाकडून भविष्यात क्रिकेट खेळणार

On: सोमवार, जुलै 4, 2022 8:11 AM
Wridhhiman-Saha-Ms-Dhoni
---Advertisement---

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा आणि क्रिकेट असोसिएसन ऑफ बंगाल (सीएबी) यांच्यातील वाद मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. आता अखेर सीएबी आणि साहा यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. साहाला आता त्रिपुरा संघासाठी खेळायचे आहे आणि सीएबीने यासाठी त्याला एनओसी (ना हरकत) दिली आहे. शनिवारी (२ जुलै) सीएबीने अनुभवी यष्टीरक्षकाला एनओसी दिल्याचे जाहीर केले.

रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. बंगाल संघाची साथ सोडल्यानंतर आता तो त्रिपुरा संघासाठी खेळणार देखील आणि संघाच्या मेंटॉरची भूमिकाही सांभाळणार आहे. सीएबीने माहिती दिली की, “रिद्धिमान साहा सीएबीमध्ये आला आणि अध्यक्ष अभिषेक डालमियांकडे त्याने अर्ज दिला, ज्यामध्ये त्याने एसोसिएशनकडे एनओसीची मागणी केली होती. सीएबीने सहाच्या विनंतीनंतर त्याला दुसऱ्या राज्यासाठी खेळण्याची एनओसी दिली. सीएबीने त्याला भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.”

सीएबीचे संयुक्त सचिव देवव्रत दास यांनी साहाविषयी एक सार्वजनिक वक्तव्य केले होते, त्यानंतर साहा चांगलाच नाराज झाला. सचिवांनी राज्याच्या संघासाठी साहाच्या प्रमाणिकतेवर प्रश्न उपस्थित केला होता. संघ व्यवस्थापनातील महत्वाच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे शंका उपस्थित केल्यानंतर साहाने त्याची नाराजी व्यक्त केली होती. मागच्या महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत साहा म्हटला होता की, “माझ्यासाठी ही खूप दुःखाची गोष्ट आहे की, बंगालसाठी एवढ्या मोठ्या काळापासून खेळत आल्यानंतर मला अशा काही गोष्टींमधून जावे लागले.” त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनकडून माहिती दिली गेली आहे की, साहा त्यांच्या संघाच मेंटॉर आणि कर्णधार असणार आहे.

साहाच्या एकंदरीत क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत भारतासाठी ४० कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९.४१ च्या सरासरीने १३५३ धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटचा विचार केला, तर मागच्या १५ वर्षांमध्ये त्याने बंगालसाठी १२२ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि यामध्ये ६४२३ धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी ४१.९८ राहिली. त्याने १३ शतक आणि ३८ अर्धशतके ठोकली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

विराटची स्लेजिंग टीम इंडियाला नडली? शाब्दिक चकमकीनंतर बेयरस्टोचे झंजावाती शतक

पीवायसी रावेतकर फाईव्ह-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत सामुराईज, टायटन्स, निंजाज संघांचे विजय

लाईव्ह सामन्यात पाकिस्तानी पंचाशी भिडला विराट कोहली, विचारला जाब; पाहा नेमकं काय घडलं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---