आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बाॅर्डर गावसकर क्रिकेट मालिकेतील सर्व कसोटी सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना तीन डिसेंबर रोजी ब्रिस्बेन येथे सुरू होणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यात भारत एकूण चार कसोटी सामने खेळणार आहे. या कसोटी सामन्यांची ठिकाणे देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून निश्चित करण्यात आली आहेत.
दुसरा कसोटी सामना ११ डिसेंबर ऍडलेड, तिसरा २६ डिसेंबर मेलबर्न, चौथा ३ जानेवारी सिडनी येथे होणार आहे. यातील अॅडिलेड येथे होणारा दुसरा कसोटी सामना हा डेनाईट सामना असणार आहे.
सिडनी कसोटी सामन्यानंतर ४ दिवसांनंतर लगेच दोन संघात ३ वनडे सामन्यांची मालिका होणार असून याची सांगता १७ जानेवारी रोजी मेलबर्न येथे होणार आहे. यात पर्थ, एमसीजी मेलबर्न व सिडनी येथे हे वनडे सामने होणार आहेत.
९ ऑगस्ट पासून झिंबाब्वे संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे. याच मालिकेने ऑस्ट्रेलियाचा समर सिझन सुरु होणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचा ऑक्टोबर महिन्यात टी२० दौरा अपेक्षित आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिका-
११ ऑक्टोबर- ब्रिस्बेन
१४ ऑक्टोबर- कॅनबेरा
१७ ऑक्टोबर- एॅडलेड
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका-
३-७ डिसेंबर- ब्रिस्बेन
११-१५ डिसेंबर- ऍडलेड
२६-३० डिसेंबर- मेलबर्न
३-७ जानेवारी- सिडनी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका-
१२ जानेवारी- पर्थ
१५ जानेवारी- मेलबर्न
२८ जानेवारी- सिडनी






