क्रिकेट ऑस्ट्रेलिया (cricket australia) चे प्रमुख निक हॉकले (nick hockley) यांनी रविवारी (२६ डिसेंबर) क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगवेगळे प्रशिक्षक नियुक्त करण्याचे संकेत दिले. दिग्गज जस्टिन लँगर (Justin Langer) सध्या ऑस्ट्रेलिया संघाचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकांमधील प्रशिक्षक आहेत. पुढच्या वर्षी लँगर यांचा संघासोबतचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर तो संघाचे तिन्ही प्रकरांतील प्रशिक्षक राहतील की नाही, याबाबत हॉकलेंनी स्पष्ट उत्तर दिले नाही.
प्रशिक्षक लँगर यांचा ऑस्ट्रेलिया संघासोबतचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपणार आहे. त्यांनी संघाच्या प्रशिक्षकपदावर कायम राहण्याची इच्छा आधीच व्यक्त केली आहे. मात्र, भविष्यात तिन्ही प्रकारांमध्ये त्यांना प्रशिक्षण देता येईळ याबाबतीत अस्पष्टता आहे. कारण, यापूर्वी मायकल डी वेनुटो आणि ऍण्ड्रू मॅकडोनाल्ड यांच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाची जबाबदारी दिली गेली होती.
सिडनी मॉर्निग हेराल्डशी बोलताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख हॉकले म्हणाले की, “वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वेगवेगळे प्रशिक्षक हा एक असा विषय आहे, ज्याविषयी आम्ही हंगामाच्या शेवटीपर्यंत विचार करू.”
यावेळी बोलताना हॉकलेने या गोष्टीची पुष्टी केली की, जस्टिन लँगर त्यांचा चार वर्षांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील. हॉकले म्हणाले की, “जस्टिन लँगर त्यांचा करार पूर्ण करतील, यात कसलीच शंका नाही. हा पुढच्या वर्षीच्या जूनपर्यंत चालेल. आम्ही ऍशेस मालिका संपल्यावर, नंतर बसून यावर चर्चा करू की, येथून पुढे कसे जायचे आहे. आम्ही चर्चेतून या प्रक्रियेवर काम करू की, त्यावेळी काय मागणी आहे आणि नंतर त्याविषयावर काही बोलता येईल.”
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडविरुद्ध सध्या ऍशेस मालिका खेळत आहे. ऍशेस मालिकेतील ऑस्ट्रेलिया संघाचे आतापर्यंतचे प्रदर्शन पाहता ते अप्रतिम राहिले आहे. ऍशेस मालिकेतील दोन कसोटी सामना खेळले गेले आहेत आणि दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाला मात दिली आहे. उभय संघातील तिसरा कसोटी सामना बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) दिवशी सुरू झाला असून, ऑस्ट्रेलिया संघ भक्कम स्थितीत आहे आणि विजयाच्या दिशने चालला आहे.
महत्वाच्या बातम्या –
काय असते व्हीजेडी प्रणाली? का या पद्धतीला डकवर्थ लुईसपेक्षा चांगले समजते जाते? जाणून घ्या
ज्या डीआरएसने वाचवले, त्याबद्दलच वाईट बोलला हॅरिस; आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाल्याने वाढलं टेंशन
व्हिडिओ पाहा –