---Advertisement---

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाचे मनोबल उंचावण्याचे केले तोकडे प्रयत्न, मात्र पडले तोंडघशी! पाहा व्हिडिओ

On: सोमवार, जानेवारी 11, 2021 4:06 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तिसरा कसोटी सामना आज सिडनीच्या मैदानावर अनिर्णीत अवस्थेत संपला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शेवटच्या दिवशी १३१ षटकात ५ बाद ३३४ धावा उभारल्या. आर अश्विन आणि हनुमा विहारी यांनी चिवट झुंज देत शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजाना एकही बळी मिळवू दिला नाही.

मात्र बळी मिळत नसल्याने हे गोलंदाज वैतागलेले दिसले. कर्णधार टीम पेन देखील बळी मिळत नसल्याने अस्वस्थ झाल्याचे दिसला. अशातच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटरवर टाकलेल्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २००८ साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील सामन्यातीलच एक व्हिडिओ पोस्ट केला. या सामन्यात दिवसाचा खेळ संपायला तीनच षटके शिल्लक असताना भारताची धावसंख्या ७ बाद २०८ अशी होती. त्यावेळी गोलंदाजीला आलेल्या पार्टटाईम फिरकीपटू मायकेल क्लार्कने एकाच षटकात ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे यावेळीही असंच काहीतरी घडेल, अशा अर्थाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. तसेच ‘चमत्कार घडू शकतात’ अशी कॅप्शन देखील त्यांनी या व्हिडिओला दिली होती.

https://twitter.com/cricketcomau/status/1348515787573665792?s=20

मात्र भारतीय संघाने आपल्या दृढनिश्चयाने त्यांचे हे मनसुबे धुळीला मिळवत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी कायम असून आता दोन्ही संघ ब्रिस्बेन येथील चौथ्या सामन्यात विजयसाठी कसोशीने प्रयत्न करतील.

महत्वाच्या बातम्या:

मैं तो तेरे को हरामी समझता था, तू तो देव मानुष निकला रे, पंतच्या धमाकेदार खेळीनंतर मीम्सचा पाऊस

काय सांगता! कॅप्टनच्या त्या चुकीमुळे हुकली कांगारुंची सिडनी कसोटी जिंकण्याची शेवटची संधी?

शब्बास रे पठ्ठ्यांनो!! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना अनिर्णित झाल्यावर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---