---Advertisement---

‘मैं तो तेरे को हरामी समझता था, तू तो देव मानुष निकला रे’, पंतच्या धमाकेदार खेळीनंतर मीम्सचा पाऊस

On: सोमवार, जानेवारी 11, 2021 3:00 PM
---Advertisement---

‘आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव’ हा क्रिकेटमधील मंत्र काय असतो?, याचा प्रत्यय रिषभ पंत याने आज (११ जानेवारी) सर्वांना दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या डावात त्याने तूफानी खेळी केली आहे. भारताचा हा यष्टीरक्षक फलंदाज संघाच्या पहिल्या डावात दुखापती झाला होता. मात्र दुखापतीनंतर जिद्दीने दुसऱ्या डावात मैदानात उतरत त्याने ९७ धावांची धमाकेदार खेळी केली. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्याविषयी मीम्स व्हायरल करायला सुरुवात केली आहे.

पुजारासोबत केली शतकी भागिदारी – 

सिडनी कसोटीच्या शेवटच्या आणि भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात पंतने आतिशी खेळी करत ९७ धावा केल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेची विकेट पडल्यानंतर पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. जोरदार फटकेबाजीने फलंदाजीची सुरवात करत पंतने ११८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकार मारत ही धावसंख्या गाठली. सोबतच चेतेश्वर पुजारासोबत मिळून चौथ्या विकेटसाठी शतकाहून अधिक धावांची भागिदारी केली.

शेवटी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन लायनच्या फिरकीत फसल्याने पंतला पव्हेलियनला परतावे लागले. परंतु तोवर भारतीय संघाने २५० धावा फलकावर नोंदवल्या होत्या. त्यामुळे संघाच्या सामना जिंकण्याच्या आशांना वाचा फुटला होता.

पंतच्या या दमदार फलंदाजीनंतर चाहत्यांनी मजेदार मीम्सच्या साहाय्याने त्याचे कौतुक केले आहे. एका चाहत्याने परेश रावल या बॉलिवूड अभियंत्याचा चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर त्याने “मै तो तेरेको हरामी समजा था, तू तो देव-मानुष निकला रे..”, असे लिहिले आहे. तर एका चाहत्याने विरेंद्र सेहवागचा चेहरा एका फोटो लावत लिहिले की, “टेक्निक बहुत सही है तुम्हारी.”

https://twitter.com/corona_warrior/status/1348470082314203136?s=20

https://twitter.com/brb_memes7/status/1348505401856196609?s=20

https://twitter.com/CricketMemes718/status/1348436994519486464?s=20

अश्विन-विहारीने शेवटी सांभाळला भारताचा डाव

रिषभ पंतची महत्त्वपुर्ण विकेट गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने चेतेश्वर पुजाराला त्रिफळाचीत केले. त्यामुळे भारतीय संघाची गाडी डगमगली. परंतु हनुमा विहारी आणि आर अश्विनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे चिवट झुंज देत सामना अनिर्णीत राखण्यात मोलाचा वाटा उचलला. विहारीने शेवटच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद २३ धावा तर अश्विनने नाबाद ३९ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

AUS vs IND 3rd Test : ‘विहारी आणि अश्विन’ जोडीकडून कामगिरी फत्ते!! तिसरा कसोटी सामना अनिर्णित अवस्थेत संपुष्टात

शब्बास रे पठ्ठ्यांनो!! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना अनिर्णित झाल्यावर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव

“हाताचं प्रत्येक बोट वेगवेगळं काम करत, अगदी तसंच..” सचिनकडून पुजारा-पंतवर कौतुकाची थाप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---