ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne) याने शुक्रवारी अचानकपणे जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्नच्या अचानक जाण्याने संपूर्ण क्रिकेटविश्व हैराण आहे. थायलंडमध्ये स्वतःच्या मालकिच्या विलावर ह्वदयविकाराच्या झटका आल्यामुळे वॉर्नचा मृत्यू झाल्याचे सांगितले गेले आहे. त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
वॉर्नच्या निधनानंतर क्रिकेट विश्वातील आजी-माजी अशा सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. वॉर्नने ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी दिलेले योगदान बहुमूल्य आहे आणि याच कारणास्वत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घोषणा केली की, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमधील (एमसीजी) ‘द ग्रेट साउदर्न स्टॅन्डचे’ नाव बदलून आता ‘एसके वॉर्न’ स्टॅन्ड केला जाईल.
शेन वॉर्नने वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे, पण यादरम्यान त्याने अनेक अविस्मरणीय सामने खेळले. मृत्यूच्या जवळापास १२ तास आधी वॉर्नने ऑस्ट्रेलियन दिग्गज रॉड मार्शला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ट्वीट केले होते, पण या ट्वीटनंतर काहीच तासात स्वतः त्यानेच जगाचा निरोप घेतला. वॉर्नचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीने याविषयी माहिती देताना सांगितले की, “शेन वॉर्न त्याच्या विलामध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. वैद्यकिय क्रर्मचाऱ्यांची खूप प्रयत्न केले, पण त्याचा जीव वाचवता आला नाही.”
A special tribute for the one and only Shane Warne. pic.twitter.com/0b0LJ3ilgM
— cricket.com.au (@cricketcomau) March 5, 2022
शेन वॉर्न जागतिक क्रिकेटमधील एक महान खेळाडू होता आणि त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. वॉर्नचे अनेक विक्रम आजही अबाधित आहेत आणि भविष्यातही हे विक्रम मोडणे सोपी गोष्ट नसेल. वॉर्न कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याने १४५ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आणि यामध्ये ७०८ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत, ज्याने ८०० कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वॉर्नने १९४ सामने खेळले आणि यामध्ये २९४ विकेट्स घेतल्या.
वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी १९९२ साली पदार्पण केले होते आणि त्यानंतर अनेक दिग्गजांना त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. आयपीएल स्पर्धा २००८ साली सुरू झाली होती आणि पहिल्याच हंगामात राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता.
महत्वाच्या बातम्या –
“रोहितला गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीचा पुनरावृत्ती करण्याची गरज”