इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाची सर्व संघांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. आयपीएल ही क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पर्धा असल्याने जगभरातील जवळजवळ सर्वच प्रमुख देशातील खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेत असतात. या सर्वांमध्ये ऑस्ट्रेलियन स्टार्समुळे स्पर्धेची चमक आणखीनच वाढते. अशातच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना देण्यात येणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्र (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट किंवा एनओसी) बाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले की, ते खेळाडूंना परिस्थिती लक्षात घेऊन एनओसी प्रमाणपत्र जाहीर करतील. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून हे वक्तव्य दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्यानंतर आले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाद्वारे निक हॉकले म्हणाले, “आयपीएलने मागील वर्षी बायो-बबल निर्माण केले होते. यावर्षी आमच्याकडे अर्ज आल्यानंतर आम्ही पूर्ण विचार करून निर्णय घेऊ.” एकंदरीतच तर्क लावला जात आहे की, जर खेळाडूंना दुखापत नसेल तर त्यांना एनओसी दिला जाईल.
आयपीएल लिलावाच्या दृष्टीने ऑस्ट्रलियन खेळाडू अतिशय महत्त्वाचे आहेत. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, ऍरॉन फिंचसारखे स्टार या लिलावात असल्याने यावेळी एक वेगळी ऊर्जा अनुभवली जात आहे. मिचेल स्टार्क देखील या लिलावात सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. अनेक क्रिकेट पंडितांच्या मते स्टार्क जर लिलावात सहभागी झाला तर तो आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू देखील ठरू शकतो. या सर्व चर्चेदरम्यान हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की, ऑस्ट्रलीयन क्रिकेट बोर्ड अंतिमतः काय निर्णय घेते?.
महत्त्वाच्या बातम्या-
सीएसकेला मिळाला नवा स्पॉन्सर?, ‘इतक्या’ कोटींचा करार झाल्याची शक्यता
“ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारताचा विजय अतुलनीय!” पाहा कोणी केलंय कौतुक