मुंबई । इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) पुनरागमन करण्यासाठी स्टीव्ह स्मिथसाठी ‘कन्कशन प्रोटोकॉल’ पाळत असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) गुरुवारी स्पष्ट केले. आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्मिथ याच्या फिटनेसवर ते कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले.
स्टीव्ह स्मिथचे क्रिकेटमध्ये पुनरागमन व्हावे, यासाठी ते रॉयल्स बरोबर काम करीत असल्याचे ऑस्ट्रेलियन बोर्डाचे म्हणणे आहे. नुकत्याच इंग्लंड विरुद्ध पार पडलेल्या वनडे मालिकेआधी स्मिथला सराव दरम्यान डोक्याला चेंडू लागला होता. त्यामुळे स्मिथ इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला नाही.
“जेव्हा डोक्याच्या दुखापतीचा परिणाम होतो, तेव्हा गेल्या 12 महिन्यांत आम्ही पाहिल्याप्रमाणे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे कठोर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. आम्ही त्यास तडजोड करणार नाही,” असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे क्रीडा विज्ञान विभागाचे प्रमुख अलेक्स कोंटोरिस एका निवेदनात म्हटले आहे.
“स्टीव्ह चांगली प्रगती करीत आहे. कन्कशन प्रोटोकॉलद्वारे आमच्या वैद्यकीय संघाशी संपर्क साधत आहोत. युएईमध्ये आल्यावर स्मिथच्या फिटनेसवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकत्र काम करतील,” असेही कोटिन्स म्हणाले.
स्मिथशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे अन्य क्रिकेटपटू गुरुवारी रात्री युएई येथे दाखल झाले. त्यानंतर ते कवारंटाइनमध्ये असतील. तिथे त्यांच्या कोरोना टेस्ट होती त्यानंतर त्यांना जैव-सुरक्षित वातावरणात प्रवेश दिला जाईल.