---Advertisement---

ऑस्ट्रेलियाची ‘ही’ सुंदर स्पोर्ट्स अँकर आहे विराटची खूप मोठी फॅन; भारतात येऊन खायचेत ‘छोले- भटुरे’

On: शनिवार, डिसेंबर 26, 2020 12:03 AM
---Advertisement---

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर पालकत्व रजेवर मायदेशी परतला आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिडा निवेदिका विराट कोहलीची खूप आठवण काढत आहे. कारण ही निवेदिका कोहलीची खूप मोठी चाहती आहे.

ऑस्ट्रेलियन निवेदिका अमांडा बेली ही विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. तिची इच्छा आहे की विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने त्यांच्या होणार्‍या बाळाला ऑस्ट्रेलियात जन्म द्यावा. जेणेकरून ते बाळ भविष्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर व्हावे.

अमांडा बेली ही चॅनल 9 स्पोर्ट्सची निवेदिका आहे. तिचा आवडता क्रिकेटपटू विराट कोहली आहे. त्याचबरोबर ती आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची सुद्धा चाहती आहे. त्यामुळे ती आरसीबी संघाचे सामने बघते.

https://www.instagram.com/p/B2lRb4VBRZU/?utm_source=ig_web_copy_link

क्लो अमांडा बेली हिला भारत देशाबद्दल आकर्षण आहे. तिला भारतीय खाद्यपदार्थांमधील छोले-भटुरे खूप आवडतात. भारतात येऊन छोले-भटुरे खाण्याची तिची इच्छा आहे. अमांडा बेली ही तिच्या फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे. ती आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देते. त्याचबरोबर तिचे सिक्स पॅक ऍब्स सुद्धा आहेत.

https://www.instagram.com/p/BvqnkmBBzj-/?utm_source=ig_web_copy_link

फिटनेससाठी ती जिममधे जास्त घाम गाळते. अमांडा बेली आपल्या आरोग्याला जपण्यासाठी योगासनेही करते. बेलीला कुत्रेही खूप आवडतात.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भारतीय संघाने क्षेत्ररक्षणावर लक्ष देण्याची आवश्यकता’, माजी दिग्गजाने साधला निशाणा 

स्टीव्ह स्मिथला क्रिकेटमध्ये ‘या’ गोष्टीचा येतो सर्वात जास्त राग; नॅथन लायनसोबतच्या चर्चेदरम्यान खुलासा

रवी शास्त्री पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर; ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---