मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना भारताकडून खेळला नाही. भविष्यात तो भारतीय संघाकडून खेळेल की नाही यावरती साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला बांगलादेशविरुद्ध सुरुवात करणाऱ्या धोनीने पुढे मागे वळून कधी पाहिले नाही.
आयसीसीच्या सर्वच स्पर्धा भारताला जिंकून देणारा तो एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दोन विश्वकरंडक स्पर्धा जिंकल्या आहेत. ‘कॅप्टन कूल’ म्हणून प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंग धोनी आजही करोड क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. अनेक युवा क्रिकेटपटूसाठी तो आदर्श खेळाडू आहे.
देश विदेशातील आजी माजी खेळाडू देखील धोनीचे खूप मोठे फॅन आहेत. बांगलादेश क्रिकेट टी-20 संघाचा कर्णधार महमुदुल्लाह हा देखील धोनीचा खूप मोठा फॅन असून तो धोनीकडून नेहमी प्रेरणा घेत असतो, असे त्याने फेसबुकाच्या द्वारे खुलासा केला आहे.
महमुदुल्लाह म्हणाला की, धोनी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरतो. जेव्हा पण मी निवांत असतो तेव्हा धोनीचा व्हिडिओ फुटेज पाहत असतो. अनेक लाईव्ह सामने देखील पाहिलो आहे. त्यांच्यासारखा खेळण्याचा मी प्रयत्न करत असतो. फलंदाजी करताना मी धोनीच्या स्टाइलला कॉपी करत असतो.
महमुदुल्लाहच्या मते, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 90 च्या स्ट्राइकने खेळणे तेवढे सोपे नाही. धोनी सामना शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जातो. महमुदुल्लाहच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या टी २० मालिकेत पहिला विजय मिळवला होता. पण बांगलादेशने ही मालिका 2-1 अशा फरकाने गमावली होती.