सध्या महिला आशिया चषक सुरु आहे. त्यानंतर महिला आयसीसी टी20 विश्वचषक देखील खेळला जाणार आहे. तत्पूर्वी बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसक घटनांमुळे, त्यांना आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024चे यजमानपद गमवावे लागू शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसक घटनांमुळे काळजी करत आहे आणि तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
बांगलादेशात आरक्षणाबाबत वादावाद सुरु आहेत. आयसीसीचं (ICC) सदस्य आणि व्यवस्थापक सध्या कोलंबोमध्ये आहेत. त्यांनी बांगलादेशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसला तरी, आयसीसी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.
आयसीसीच्या एका सूत्रानं क्रिकबझशी बोलताना सांगितले की, “आम्ही बांगलादेशमधील परिस्थितींवर लक्ष ठेवून आहोत, परंतू विश्वचषकासाठी अजून बराच वेळ शिल्लक आहे. गेल्या काही तासांत तिथली परिस्थिती सुधारली आहे.”
बांगलादेशमधील अनेक भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि याशिवाय अनेक परदेशी विद्यार्थीही बांगलादेश सोडून जात आहेत, त्यामुळे आयसीसी सदस्य चिंतेत आहेत. आयसीसीनं 2024च्या महिला टी20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. यावेळी भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना उपस्थित होत्या.
आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024मध्ये एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने ढाका आणि सिल्हेटमध्ये 19 दिवसांत होणार आहेत. या स्पर्धेसाठी 2 गट तयार करण्यात आले आहेत. अ गटात 5 संघ आहेत. ब गटातही 5 संघ आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि क्वालिफायर 1 चे संघ असतील. तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि क्वालिफायर 2 संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे.
महिला आयसीसी टी20 विश्वचषकासाठीचे वेळापत्रक
3 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका
3 ऑक्टोबर- बांगलादेश विरुद्ध क्वालिफायर 2, ढाका
4 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर 1, सिल्हेट
4 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
5 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
5 ऑक्टोबर- बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, ढाका
6 ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर 1, सिल्हेट
6 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, सिल्हेट
7 ऑक्टोबर- वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर 2, ढाका
8 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, सिल्हेट
9 ऑक्टोबर- बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
9 ऑक्टोबर- भारत विरुद्ध क्वालिफायर 1, सिल्हेट
10 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर 2, ढाका
11 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
11 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर 1, सिल्हेट
12 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
12 ऑक्टोबर- बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका
13 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
13 ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिल्हेट
14 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर 2, ढाका
17 ऑक्टोबर- पहिली उपांत्य फेरी, सिल्हेट
18 ऑक्टोबर- दुसरी उपांत्य फेरी, ढाका
20 ऑक्टोबर- अंतिम सामना, ढाका
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त मैदानावरच नाही, तर बिझनेसमध्येही ‘किंग’ बनणार कोहली, हा आहे मास्टर प्लॅन!
ENG vs WI कसोटी सामन्यादरम्यान दिसला बेन स्टोक्सचा डुप्लिकेट! पाहा VIDEO
टी20 आशिया चषकात शतक ठोकणारी पहिली महिला क्रिकेटपटू, दिग्गज मिताली राजचा विक्रम मोडला