डिसेंबर 2019 मध्ये ऑस्टेलियाविरुद्ध (Australia) झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला 0-3ने पराभव स्विकारावा लागला होता. तसेच जानेवारी 2020च्या सुरुवातीला भारताविरुद्ध (India) झालेल्या टी20 मालिकेतही न्यूझीलंडला 0-5ने पराभूत व्हावे लागले होते.
मात्र यानंतर न्यूझीलंड संघाने उत्कृष्ट कामगिरी करत भारताविरुद्ध वनडे (3-0) आणि कसोटी (2-0) मालिकेत विजय मिळवला. त्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केेन विलियम्सन (Kane Williamson) खूश झाला आहे.
काल (2 मार्च) ख्राईस्टचर्च (Christchurch) येथे 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 7 विकेट्सने पराभूत केले.
यानंतर आपले मत मांडताना विलियम्सन म्हणाला की, “भारतीय संघ एक जागतिक दर्जाचा संघ आहे. त्यामुळे भारताला पराभूत करून समाधान वाटत आहे. तसेच एक वेगळीच भावना निर्माण झाली आहे. यावेळी आम्हाला दोन्हीही सामन्यात खेळपट्टीचा खूप फायदा झाला. त्यामुळे गोलंदाजांनाही चांगली कामगिरी करता आली.”
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ 124 धावांवर संपुष्टात आला. यानंतर न्यूझीलंडने 3 बाद 132 धावा करत सामना जिंकला. यावेळी विलियम्सन म्हणाला की, धावफलक कदाचित ही एकतर्फी स्पर्धा असल्याचे सूचित करेल. परंतु तसे काहीही झाले नाही.
“शेवटचा निकाल तो सामना किती कठीण होता हे दाखवतो, असे मला वाटत नाही. यावेळी आम्ही पाहिले की चेंडू कितीतरी वेळा बॅटवर येत होता,” असेही विलियम्सन यावेळी म्हणाला.
भारताविरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत विलियम्सनने 3 डावात अनुक्रमे 89, 3 आणि 5 धावांची खेळी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–न्यूझीलंडचा ‘हा’ गोलंदाज म्हणतो विराटला चूका करताना पाहून खूप छान वाटले…
–तर कोहलीच्या जागी हा खेळाडू होणार टीम इंडियाचा कर्णधार
-न्यूझीलंडची कसोटी चॅम्पियनशीपमध्ये मोठी भरारी, जाणून घ्या टीम इंडियाचे गुण