fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विराट व स्मिथमध्ये ‘हा’ फलंदाज पोहचू शकतो सर डाॅन ब्रॅडमनच्या आसपास

विराट नव्हे तर हा आहे सर्वश्रेष्ठ फलंदाज – ब्रेट ली

मुंबई । जागतिक क्रिकेटमध्ये सध्या ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव स्मिथ आणि भारताचा कर्णधार विराट कोहली हे नंबर वन खेळाडू आहेत. भल्याभल्या गोलंदाजांची बोलती बंद करणारे हे दोन खेळाडू जेव्हा धावा काढतात तेव्हा संघाचा विजय पक्का असतो. क्रिकेट फॅन्स आणि एक्सपर्ट नेहमी दोघांपैकी कोणता फलंदाज उत्कृष्ट आहे, यावरती नेहमी चर्चा करतात.

नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने विराट कोहलीपेक्षा स्टीव स्मिथ हा उत्कृष्ट फलंदाज असल्याचे सांगितले. ब्रेट ली एका लाईव्ह चॅटमध्ये बोलताना म्हणाला की, विराट आणि स्मिथ या दोघांपकी एकाला निवडणे फारच मुश्किल आहेत. दोघेही श्रेष्ठ खेळाडू आहेत. पण एक गोलंदाज या नात्याने विराटच्या फलंदाजीत काही कामकुवत बाजू दिसतात. विराट पूर्वी ऑफस्टम्प वर खेळत असताना अडचणीत यायचा. आता ही त्याला अडचण जाणवत नाही. तो सुपर फिट आहे आणि एक चांगला कर्णधारही.

ली पुढे बोलताना म्हणाला की, मागील दोन वर्षात स्मिथ मध्ये बराच बदल झाला आहे. एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून मी त्याची निवड करेन. अनेकदा कठीण प्रसंगी संघासाठी धावा काढल्या आहेत. मानसिक दबावाखाली चांगली कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले आहे तरीही विराट आणि स्मिथ या दोघांपकी एकाला निवडणे अवघड आहे. विराट आणि स्मिथ हे दोन खेळाडू माझा मुलगा प्रेस्टन यास खूप आवडतात विराटने काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाला टी शर्ट भेट दिला होता.

स्मिथ एकदम कणखर-

स्टिव स्मिथबद्दल पुढे बोलताना ब्रेट ली म्हणाला, तो मानसिक दृष्टीने अतिशय कणखर आहे. तो ब्रॅडमनसारखा होऊ शकतो. विराट व स्मिथ दोघेही उच्च दर्जाचे खेळाडू आहे.

You might also like