---Advertisement---

राशीद खाननं दिलेला शब्द सार्थ करुन दाखवलं, दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी ठरली खरी

---Advertisement---

राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत धडक मारली. अफगाणिस्तानने टी20 विश्वचषक मधील सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानने कोणत्याही विश्वचषकाची सेमी फायनल फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ होती. विश्वचषकास सुरुवात होण्यापूर्वी दिग्गज ब्रायन लाराने टाॅप-4 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या आधी अफगाणिस्तान संघाला स्थान दिले होते. आणि ते खरे ठरले आहे. या विजयानंतर रशीद खान इतका आनंदी दिसत होता की व्यक्त करण्यासाठी त्याच्याकडे शब्दही उरले नाहीत.

सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तान कर्णधार रशीद खान म्हणाला “ब्रायन लारा हा एकमेव माणूस होता ज्याने आम्हाला उपांत्य फेरीत नेले. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा मी त्याला सांगितले की मी तुम्हाला निराश करणार नाही” (स्पर्धेपूर्वी ब्रायन लाराने अफगाणिस्तान संघ यंदाच्या विश्वचषकात सेमीफायनल मध्ये पात्र ठरेल, अशी शक्यता वर्तवली होती.) आता ब्रायन लारांचे भाकीत खरे ठरवत अफगाणिस्तान सेमी फायनल साठी पात्र ठरला आहे.

या ऐतिहासिक विजयानंतर राशिद खान पुढे म्हणाला, “उपांत्य फेरी गाठणे हे आमच्यासाठी एक स्वप्न आहे. आम्ही ज्या पद्धतीने स्पर्धेची सुरुवात केली त्याबद्दल आहे. जेव्हा आम्ही न्यूझीलंडला हरवले तेव्हापासूनच आत्मविश्वास आला,” हे अविश्वसनीय आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत तो ब्रायन लारा आहे आणि आम्ही ते टूर्नामेंटच्या आधी सिद्ध केले, ‘आम्ही तुम्हाला निराश करणार नाही. आम्ही ते पूर्ण करू आणि सिद्ध करू की तुम्ही बरोबर आहात.’ मला या संघाचा अभिमान आहे.”

यासामन्यात सुरुवातीपासूनच अफगाणिस्तान संघ बांग्लादेशच्या पुढे होता. अफगाणच्या भेदक गोलंदाजी समोर बांग्लादेशचा टिकाव लागला नाही. केवळ 115 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला बांग्लादेश संघ 105 धावांत गडगडला. आणि डीएलएस नियमानुसार अफगाणिस्तान संघ हा सामना 8 धावांनी जिंकला.

महत्तवाच्या बातम्या-

अक्षर पटेलला मिळालं सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचं पदक, अशक्य झेल झेलून दिली होती सामन्याला कलाटणी
अफगाणिस्तानचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातून पत्ता कट!
रोहितचा हिटमॅन अंदाज, ऑस्ट्रेलिया गोत्यात! टीम इंडिया इंग्लंड सोबत करणार हिशोब चुकता?

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---