इंडियन प्रीमियर लीग या बहुप्रतिष्टित टी20 स्पर्धेचे 5 किताब जिंकणारा रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वकौश्यल्याचे आणि फलंदाजीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.अशातच रोहितच्या शालेय जीवनातील प्रशिक्षक दिनेश लाड आणि रोहितचा मित्र अभिषेक नायर यांनी रोहितच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
इयत्ता 9 वी वर्गात रोहित झाला शालेय संघाचा कर्णधार
भारतीय संघाचा मर्यादित षटकांचा उप-कर्णधार ‘द हिटमनः द रोहित शर्मा स्टोरी’ या पुस्तकात लाड म्हणाले की “शालेय दिवसापासून तो स्वत:च्या बळावर सामने जिंकत होता आणि त्याच्यात नेतृत्व क्षमता होती. तो विकेट्स घेत होता आणि शतकही ठोकत होता. नवव्या इयत्तेतच मी त्याला शाळेच्या संघाचा कर्णधार बनविला. तो खूप आक्रमक होता आणि नेहमी विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्या विजयात योगदान देऊ इच्छित होता. मी त्याला नेहमीच क्रीजवर शांतपणे खेळण्याचा सल्ला दिला कारण तो खेळाच्या तांत्रिक बाबींमध्ये मास्टर होता आणि त्याला बाद करणे अशक्य होते.”
चाहत्यांना रोहितच्या नवनवीन पैलूंची होईल माहिती
प्रसिद्ध क्रिकेट लेखक विजय लोकापल्ली आणि जी. कृष्णन यांनी लिहिलेल्या या पुस्तकात रोहितच्या सुवर्ण प्रवासाच्या अनेक नवनवीन बाबी समोर आल्या आहेत. यासह, त्याचे सहकारी खेळाडू, प्रशिक्षक आणि मित्रांनीही खुल्या मनाने त्याच्याबद्दल आपली मते व्यक्त केली आहेत. ब्ल्युम्सबरी या पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेले हे पुस्तक 18 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल.
रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट पुल शॉट कसा मारतो?
रोहितचा सहकारी आणि जवळचा मित्र मुंबईचा फलंदाज अभिषेक नायरने पुल शॉटमध्ये रोहितला जी महारात प्राप्त आहे त्याबद्दल बोलताना सांगितले की, “मुंबईच्या मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट ही सामान्य बाब आहे आणि तुम्हाला त्या खेळात षटकार मारावे लागतात. त्याच काळात रोहितने पूल शॉट शिकला आहे. कमी लांबीच्या चेंडूवर हुक शॉट किंवा पूल शॉट ठोकण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही. तो स्वीपर कव्हर आणि कव्हर पॉईंटवर मोठे षटकार ठोकत असे जी सोपी गोष्ट नाही. फलंदाज बरेचदा फक्त मिडविकेटवरच षटकार ठोकतात.
महत्त्वाच्या बातम्या –
हम तैयार है..! बीसीसीआयकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचे खास फोटो प्रसिद्ध
भारताच्या जावईसह ‘या’ दोन खेळाडूंना पाकिस्तान संघातून डच्चू, पाहा पूर्ण टीम
क्रिडा विश्वावर शोककळा! २० शतकांच्या मदतीने १४ हजार धावा कुटणाऱ्या दिग्गजाचे निधन
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर





