---Advertisement---

“कैसे ना हो गुजारा, जब साथ हो कोहली और पुजारा” गब्बरच्या ट्विटने जिंकली लाखो चाहत्यांची मने

On: शनिवार, जुलै 28, 2018 8:15 AM
---Advertisement---

चेम्सफोर्ड | २५ ते २७ जुलै या दरम्यान कौंटी क्रिकेट मैदानावर भारत वि. एसेक्स यांच्यात तीन दिवसीय सराव सामना पार पडला.

या सामन्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाच्या एका क्षणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

“कैसे ना हो गुजारा, जब साथ हो कोहली और पुजारा.” असे कॅप्शन देत भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनेने या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करतानाचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

या सामन्यात शिखर धवनची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे.

धवन या सराव सामन्याच्या दोन्ही डावात शून्यावर बाद झाला. मात्र आपल्या मनमौजी स्वभावसाठी प्रसिद्ध असलेल्या शिखर धवनच्या या ट्विटने असंख्य  चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

या अनिर्णित राहिलेल्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी पहिल्या कसोटी सामन्याच्या दृष्टीने सामाधानकारक कामगिरी केली आहे.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात ९ बाद ३९५ धावा केल्या होत्या.

यामध्ये दिनेश कार्तिक ८२ धावा आणि विराट कोहली ६८ धाव यांच्यासह मुरली विजय, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनीही अर्धशतके केली होती.

तर एसेक्सने पहिला डाव ८ बाद ३५९ वर घोषित केला होता.  सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात २ बाद ८९ धावा केल्या होत्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-कुलदीप यादवला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान हवेच, माजी दिग्गजाचे वक्तव्य

-तेव्हा धोनी गांगुलीला म्हणाला होता, दादा तुम्हीच कर्णधारपद सांभाळा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment