भारत-इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला 1 ऑगस्ट पासून सुरवात होत आहे.
गेल्या एक वर्षापासून भारतासाठी कुलदीप यादवने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
कुलदीपला भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
त्यामुळे सर्वांना कुलदीपकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यावर आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खाननेही कुलदीप बाबतचे आपले मत व्यक्त केले आहे.
“कुलदीपने आजपर्यंत मिळालेल्या संधीचा लाभ घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जर आता कुलदीपला कसोटी संघात समावेश केलाच आहे, तर त्याला अंतिम ११ खेळाडूंच्या संघात स्थान दिले पाहीजे.” असे जहीर खान म्हणाला.
कुलदीप भारताकडून केवळ २ कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने ९ विकेट्स घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारताने दणदणीत विजय मिळवत दिला श्रीलंकेला व्हाइटवॉश
-ज्युनिअर द्रविड चमकला! अष्टपैलू खेळ करत मिळवून दिला मोठा विजय!






