इंडिअन प्रीमिअर लीग(आयपीएल)मध्ये खूप विदेशी खेळाडू सहभाग घेत असतात. आयपीएलची स्पर्धा जवळपास २ महिने तरी चालते. म्हणून विदेशी खेळाडू आयपीएल दरम्यान आपल्या परिवारालाही भारतात घेऊन येतात. २ महिने राहिल्या नंतर खेळाडूंना आणि त्यांचा कुटुंबाला भारतीय लोकांचे राहणीमान, इकडची संस्कृती आवडू लागते. किती तरी असे विदेशी खेळाडू भारतात येऊन गेले आहे, ज्यांनी म्हटले की, भारतात येणे त्यांना पसंद आहे. भारत हे त्यांचे दुसरे घर आहे. आता ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने आपल्या इंस्टाग्रामवरुन भारतातील त्याची आवडीची जागा सांगितली आहे.
सनराइजर्स हैदराबाद संघाचा फलंदाज आणि माजी कर्णधार डेविड वॉर्नरने सांगितले की, ‘मला भारतात येणे पसंद आहे. भारत आल्यावर मला घरीच आल्यासारखेच वाटते.’ वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्रामवरुन शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, ‘ भारत माझे दुसरे घर आहे. या देशातील हैद्राबाद शहर मला फार आवडते.’
वॉर्नर गेली ४-५ वर्ष हैद्राबाद संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. काही काळ त्याने संघाचे नेतृत्त्वही केले. त्याच्या नेतृत्त्वाखाली हैद्राबाद संघाने चांगली कामगिरी करत अनेक सामनेही जिंकले आहेत. त्याच्याच नेतृत्त्वाखाली हैद्राबादने २०१६साली आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.
https://www.instagram.com/p/CQLXYJnLBZG/
दरम्यान, यावर्षी सनराइजर्स हैदराबाद संघासाठी डेविड वॉर्नरला काही खास कामगिरी करता आली नाही. सनराइजर्स हैदराबाद संघाला या स्पर्धेत मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. यामुळे चालू मोसमात डेविड वॉर्नरला चालू आयपीएल स्पर्धेतच कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले. त्यासोबत त्याचा खराब फॉर्म पाहून संघात सुद्धा स्थान दिले गेले नव्हते. त्यामुळे कर्णधारपदाची जवाबदारी केन विलीयम्सनला देण्यात आली. आयपीएलच्या पहिल्या सत्रात सनराइजर्स हैदराबाद संघ ७ सामन्यात केवळ केवळ १ सामना जिंकला होता.
डेविड वॉर्नरला सनराइजर्स हैदराबाद संघासाठी विशेष प्रेम आहे. तो कितीतरी वेळा आपल्या पत्नीला आणि मुलींना घेऊन तेलगु गाण्यावर व्हीडीओ बनवत असतो. यातील अनेक व्हीडीओ तो आपल्या सोशल मिडियावर टाकत असतो. चाहत्यांकडून सुद्धा त्याच्या या व्हिडीओंना भरपुर पसंती मिळत असते.
महत्त्वाच्या बातम्या-
–…म्हणून हर्षा भोगले यांनी WTC च्या अंतिम सामन्यात समालोचन करण्यास दिला नकार
–असा इनस्विंग तुम्ही पाहिला नसेल! या गोलंदाजाने टाकलेला चेंडू पाहून चाहत्यांना आली अक्रमची आठवण
–चर्चा तर होणारंच ना! केएल राहुलने शेअर केला अथियाबरोबर खास फोटो, अफेअरच्या चर्चांना पुन्हा जोर