---Advertisement---

“क्रिकेट मैदानापासून बॉलीवूडपर्यंत…” युवराज सिंगची डेव्हिड वाॅर्नरसाठी खास पोस्ट

On: बुधवार, जून 26, 2024 11:44 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डावखुरा फलंदाज डेव्हिड वाॅर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून (25 जून) निवृत्ती झाहीर केली. डेव्हिड वाॅर्नर क्रिकेट विश्वात दिग्गज खेळाडूपैकी एक होता. त्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. ऑस्ट्रेलिया संघ टी20 विश्वचषक 2024 मधून बाहेर पडताच स्टार फलंदाज डेव्हिड वाॅर्नरने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. मात्र तो जगभरातील टी20 लीग खेळणार आहे. या दरम्यान भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने डेव्हिड वाॅर्नरसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केला आहे. ज्यामध्ये युवराज सिंगने आपल्या आठवणींना ताजे केले आहे.

युवराज सिंगने आपल्या पोस्ट मध्ये डेव्हिड वाॅर्नरच्या करिअरचा उल्लेख करत म्हणाला, पार्कवरील सीमा तोडण्यापासून ते बॉलीवूडच्या हालचाली आणि संवादांपर्यंत, तुम्ही हे सर्व वाॅर्नर शैलीत केले. एक भितीदायक फलंदाज, एक जीवंत संघमित्र आणि मैदानावर आणि बाहेर खरा मनोरंजन करणारा, तुमच्या मित्रासोबत ड्रेसिंग रूम शेअर करताना खूप आनंद झाला. पुढील काळात कुटुंबासोबत आपल्या योग्य वेळेचा आनंद घ्या.

आयपीएल 2016 मध्ये युवराज सिंग आणि डेव्हिड वाॅर्नर सनरायर्जस हैदराबाद संघात एकत्रीत खेळले होते. डेव्हिड वाॅर्नरच्या नेतृत्तवाखाली सनरायर्जस हैदराबाद संघाने आयपीएल 2016 चा कप जिंकला होता. डेव्हिड वाॅर्नर आयपीएल मध्ये सर्वाधिक यशस्वी फलंदाजंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत 184 सामने खेळला आहे. ज्यामध्ये 6565 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 62 अर्धशतके तर 4 शतके ठोकल्या आहेत.

महत्तवाच्या बातम्या-

भारत की इंग्लंड..गयानामध्ये कोणाचं दबदबा, टीम इंडियासाठी 2 खुशखबर, फायनलचं तिकीट पक्कं?
‘भारतीयांनी चेंडूसोबत छेडछाड केलीय’, अर्शदीप सिंगवर गंभीर आरोप
भारतानं ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, आता नंबर इग्लंडचा!

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---