---Advertisement---

‘ही खेळपट्टी रोहितच्या करिअरपेक्षा खराब’, इंदोर कसोटीचे हाल पाहून नेटकरी चांगलेच संतापले

On: गुरूवार, मार्च 2, 2023 4:53 PM
IND-vs-AUS
---Advertisement---

इंदोर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी दीड डावाचा खेळ संपला. म्हणजेच, भारतीय संघाचा पहिला डाव 109 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघानेही 4 विकेट्स गमावत 156 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे पहिल्या दिवशी एकूण 14 विकेट्स पडल्या होत्या. या सर्व विकेट्स फिरकीपटूंनीच घेतल्या होत्या. अशात या खेळपट्टीबाबत पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहे. अशात, युजर्सने बीसीसीआयला ट्रोल केले. तसेच, रोहित शर्माचे नाव घेतले.

युजर्सने अशाप्रकारे साधला बीसीसीआयवर निशाणा
एका युजरने फोटो शेअर केला. या फोटोत एक व्यक्ती सामना पाहताना दिसत आहे. त्याच्या हातात एक कार्ड आहे, ज्यावर “बीसीसीआय चौथ्या आणि पाचव्या दिवसाचे तिकीट विकणे बंद करा” असे लिहिले गेले आहे. युजरने पोस्ट शेअर करत लिहिले की, “इंदोर कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बीसीसीआयला विनंती.”

या युजर्सला प्रत्युत्तर देत दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ” खरं सांगायचं झालं, तर मला वाटत नाही की, कोणताही चाहता चौथ्या किंवा पाचव्या दिवसाचे तिकीट खरेदी करत असेल.” दुसऱ्या एकाने खेळपट्टीवर निशाणा साधत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या कारकीर्दीला खराब म्हटले. तो म्हणाला की, “ही खेळपट्टी रोहित शर्माच्या करिअरपेक्षाही जास्त खराब आहे.”

https://twitter.com/SportyVishaI/status/1630793776531914752?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1630793776531914752%7Ctwgr%5E4dc74518bd566cd9f2b825c583760126d1e7a804%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fcricket%2Fstory%2Find-vs-aus-test-cricket-fans-slam-indore-test-wicket-during-india-vs-australia-match-bcci-stop-selling-day-4-5-tickets-tspo-1647150-2023-03-02

पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने घेतलेली आघाडी
सामन्यात नाणेफेक जिंकत भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत फक्त 109 धावा केल्या होत्या. यामध्ये संघाकडून विराट कोहली याने सर्वाधिक 22 धावा केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त शुबमन गिल (21) सोडला, तर एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुह्नेमन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच, नेथन लायनने 3 आणि टॉड मर्फी याने 1 विकेट घेतली होती.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर संपुष्टात आला होता. त्यांच्याकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 60 धावा केल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त मार्नस लॅब्युशेन (31), स्टीव्ह स्मिथ (26) आणि कॅमरून ग्रीन (21) यांनी 20 धावांचा आकडा पार केला. यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा याने 4, तर आर अश्विन आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या. (cricket fans slam indore test wicket during india vs australia 3rd test match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या ‘सिंहा’चा भारताविरुद्ध इतिहास! मुरलीधरनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत बनला यशस्वी फिरकीपटू
‘मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी…’, फ्लॉप ठरत असलेल्या राहुलला मिळाला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---