चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानच्या यजमान पदाखाली खेळण्यात येणार आहे. याची सुरुवात (19 फेब्रुवारी ) पासून होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान आणि न्युझीलंड या दोन संघात कराची येथील नॅशनल स्टेडियम वरती खेळला जाणार आहे. तब्बल 29 वर्षानंतर पाकिस्तानकडे यजमानपद आले आहे. 1996 चा वर्ल्ड कप हे पाकिस्तान मध्ये आयोजित केलेली यापूर्वीची शेवटची आयसीसी स्पर्धा होती. चाहते फार उत्सुकतेने चॅम्पियन्स ट्रॉफीची वाट बघत आहेत, परंतु त्यापूर्वीच दहशतवादाचे सावट चॅम्पियन्स ट्रॉफी वरती घुटमळतंय.
अफगाणिस्तान संघ पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळणार आहे, ज्यासाठी संघातील खेळाडू (12 फेब्रुवारी) रोजी पाकिस्तान मध्ये पोहोचले आहेत.या दरम्यानच (16 फेब्रुवारी)च्या रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानवरती दहशतवादी हल्ला केला. पाकिस्तानने पक्तिका आणि बरमल येथील आतंकवादी ठिकाणांवरती हवाई हल्ला केला.याशिवाय पाकिस्तानने उत्तर वाजिरिस्तान मध्ये स्थित असलेल्या शवाल क्षेत्रात दहशतवादी ठिकाणांवरती हल्ला केला आहे.
पाकिस्तानच्या कबूल फ्रंटलाईन या न्युज एजन्सी नुसार जेव्हा पाकिस्तानने वाजिरिस्तान ठिकाणांवरती हल्ला केला तेव्हा त्यामध्ये 100 साधारण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी साधारण नागरिकांच्या घरावरती हल्ला झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ची सुरुवात होईला अवघे काही दिवस बाकी आहेत, त्यातच आता पाकिस्तान – अफगाणिस्तान युद्धाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्न निर्माण झालेत.
महत्वाच्या बातम्या :
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध बांग्लादेश मोठी लढत, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार?
कोहलीच्या ‘जुगाड’ने बीसीसीआयच्या नव्या नियमांचे केले उल्लंघन? जाणून घ्या प्रकरण
क्रिकेटच्या मैदानात महान खेळाडूचे पुनरागमन, जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या संघासाठी खेळणार






