भारताचा मधल्या फळीतील माजी फलंदाज वेणुगोपाल रावने शुक्रवार, 29 जूनला आंध्र प्रदेशमधील जनसेवा पक्षात प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात केली.
वेणुगोपाल रावने 2005 साली श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रकेटमध्ये पदार्पण केले होते. भारतासाठी खेळलेल्या 16 एकदिवसीय सामन्यात वेणुगोपाल रावने 24.22 च्या सरासरीने 218 धावा केल्या आहेत.
तो भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना वेस्ट इंडीज विरुद्ध 2006 साली खेळला होता.
सततच्या खराब कामगिरीमुळे वेणुगोपालला भारताच्या एकदिवसीय संघातील स्थान एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकवता आले नाही.
वेणुगोपाल रावला भारताकडून एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
त्याने 137 प्रथम श्रेणी सामन्यात 40.93 च्या सरासरीने 7081 धावा केल्या आहेत.
तसेच त्याने आपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैद्राबाद, आणि दिल्ली डेअरडेव्हील्स संघांचे 2008 ते 2014 या काळात प्रतिनिधीत्व केले आहे.
त्यामध्ये 65 सामन्यात 22.39 च्या सरासरीने 985 धावा केल्या आहेत.
यापूर्वीही भारताच्या माजी क्रिकेटपटूंनी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर राजकारणात आपले भविष्य आजमावले आहे.
यामध्ये नवजोत सिंग सिद्धू, मोहम्मद अझरुद्दिन, मोहम्मद कैफ, प्रवीण कुमार आणि किर्ती आझाद यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
जगाला हेवा वाटावा असे क्रिकेट पुनरागमन स्टिव्ह स्मिथने करुन दाखवले!
टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी गोष्ट, मोठा खेळाडू करतोय पुनरागमन