---Advertisement---

शानदार… जबरदस्त… जिंदाबाद…! विक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नदालवर क्रिकेटविश्वातूनही कौतुकाचा वर्षाव

Rafael-Nadal
---Advertisement---

रविवारी (३० जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला पराभूत करत विक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवले. यानंतर त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे, यात क्रिकेटविश्वही मागे नाही. क्रिकेटजगतातूनही नादालवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

नदालचे विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपद
अंतिम सामन्यात नदालने पहिले दोन्ही सेट गमावले होते. मात्र, त्यानंतर त्याने अनुभवाच्या जोरावर जोरदार पुनरागमन करत नंतरचे तिन्ही सेट जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली. त्याने २-६, ६-७(५-७), ६-४, ६-४, ७-५ अशा फरकाने ५ सेटमध्ये डॅनिल मेदवेदेवला पराभूत केले. याबरोबरच तो २१ ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू ठरला आहे. त्याने या विक्रमात नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडररला मागे टाकले आहे.

नदालवर कौतुकाची उधळण
नदालने २१ वे ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्वीट केले आहे की, ‘खूप शानदार विजय होता. जबरदस्त तर म्हणावाच लागेल. पहिले दोन सेट हरल्यानंतर पुनरागमन करत २१ वे ग्रँडस्लॅम जिंकणे अद्भुत आहे. राफेल नदालचे अभिनंदन.’

https://twitter.com/sachin_rt/status/1487794215858094081

याबरोबरच एबी डिविलियर्सने ट्वीट केले की, ‘राफाने नेहमीच दाखवून दिले आहे की, खेळ काय आहे. त्याच्या खेळाबद्दल आणि प्रतिस्पर्ध्याबद्दल आदर आहे. त्याने शेवटपर्यंत दिलेली लढत आणि त्याच्या यशानंतरही त्याच्यातील नम्रता अद्भुत होती.’

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही नदालचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘लवचिकता, वचनबद्धता, धैर्य आणि वयाचा विचार नाही. तू सर्व गोष्टींची मेलबर्न पार्कवर सकाळी व्याख्या पुन्हा लिहिल्या आहेत. राफेल नदाल लढवय्या आहे. २१ वे विजेतेपद.’

तसेच दिनेश कार्तिकने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘काय सामना होता, काय व्यक्ती आहे. असं वाटत होतं की मेदवेदेव सरळ सेटमध्ये सामना जिंकेल. पण चॅम्पियन कधीच हार मानत नाही. नदालच्या सर्वोत्तम पुनरागमनापैकी एक सामना. राफेल नदालचे अभिनंदन.’

याशिवायदेखील अनेक क्रिकेटपटूंनी नदालचे कौतुक केले आहे.

https://twitter.com/Hanumavihari/status/1487774260890271747

नदाल पुरुष एकेरीचे सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणारा टेनिसपटू ठरला आहे. या यादीत त्याच्यापाठोपाठ रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच हे दोन टेनिसपटू संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनीही प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –  

ऑस्ट्रेलियन ओपन नावे करत नदाल बनला टेनिसविश्वाचा राजा! जिंकले विश्‍वविक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम

नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर, व्हिसा प्रकरणामुळे ऐतिहासिक विजयाचे स्वप्न भंगले

ऍश्ले बार्टी बनली ऑस्ट्रेलियन ओपनची सम्राज्ञी!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---