भारतीय कर्णधार विराट कोहलीवर इंग्लिश गोलंदाज जेम्स अॅंडरसनने कडक शब्दात टिका केली होती.
“विराटने धावा केल्या नाही तर त्याला खरचं काही फरक पडणार नाही का? मला असे वाटते की विराट खोटे बोलत आहे.” असे जेम्स अॅंडरसन विराटवर टीका करत म्हणाला होता.
अॅंडरसनच्या या टीकेला भारताच्या सलामीवीर गौतम गंभीरने सडेतोड उत्तर दिले आहे.
“विराटने वेळोवेळी सिद्ध केले आहे की, सध्याच्या काळात विराट जगातील महान फलंदाज आहे. त्यामुळे अॅंडरसनच्या आरोपात कही तथ्य नाही. रिकी पॉन्टिंगला सुद्धा भारतात एकच शतक करता आले आहे. तरीही त्याची महानता कमी झालेली नाही. विराटने २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यातील अाठवणी मागे सोडल्यास या दौऱ्यात विराट दमदार कामगिरी करेल.” असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला.
२०१४ च्या दौऱ्यात कोहलीची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती. त्याला जेम्स अँडरसनच्या स्विंग गोलंदाजीपुढे लोटांगण घालावे लागले होते. त्याने पाच सामन्यात १३.४० च्या सरासरीने फक्त १३४ धावा करता आल्या होत्या. त्याला अँडरसनने चार वेळा बाद केले होते.
त्यामुळे या दौऱ्यातही भारत विरुद्ध इंग्लंड सोबतच कोहली विरुद्ध अँडरसन हा सामना सुद्धा रोमांचक होणार आहे.अँडरसनने विराटवर टिका करत याचे रणशिंग फुंकले आहे.
यामध्ये गौतम गंभीरने विराटची बाजू घेत, त्याची जोरदार पाठराखण केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–एमएस धोनी आणि धडक फेम इशान खट्टर झाले फुटबॉल सामन्यात सैराट
–बीसीसीआयचा हा पराक्रम युसूफ पठाणमुळे हुकला