---Advertisement---

फक्त गौतम गंभीरमुळेच भारतीय संघात येऊ शकलो

On: मंगळवार, जून 12, 2018 5:29 PM
---Advertisement---

14 जूनला होत असलेल्या अफगाणिस्तान विरूद्धच्या कसोटी सामन्यातून यो-यो टेस्ट फेल झाल्यामुळे मोहम्मद शमीला या कसोटीमधून वगळले आहे.

मोहम्मद शमीच्या जागी निवड झालेल्या नवदिप सैनीची कालपासून सर्वत्र चर्चा आहे. याच नवदिप सैनीचा टेनिस बॉलचा गोलंदाज ते भारतीय कसोटी संघाचा सदस्य हा प्रवास खूपच रंजक आहे.

लेदर बॉलवर कधीही गोलंदाजी न केलेल्या सैनीला 2013 रणजी मोसमावेळी दिल्ली संघाला नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याचं आयुष्यंच पालटून गेले.

यावेळी सैनीने भारताचा सलामीवीर गौतम गंभीरवर एक वेगळीच छाप सोडली. गौतम गंभीरच्या प्रयत्नानेच आज नवदिप सैनीला भारतीय संघात प्रवेश करण्याची संधी मिळाली.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नवदिप सैनीने आपला प्रवास ऊलघडला.

तो म्हणाला, “मला ज्यावेळी पहिल्यांदा दिल्ली संघाला नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली त्यापूर्वी लेदर बॉल केव्हाच हाती घेतला नव्हता. मी गोलंदाजी करण्यासाठी बॉल हाती घेतला तेव्हा गौतम भैय्यांनी मला सांगितले की, तू टेनिस बॉलवर जशी गोलंदाजी करतो तशीच लेदर बॉलवर कर. गौतम भैय्यांनी मला जे सांगितले तेच मी केले त्यामुळेच मी आज इथे आहे. मी जेव्हा जेव्हा गौतम भैय्यांविषयी तेव्हा भावनिक होतो.”

“मला आठवतेय गौतम भैय्यांनी निवड समितीला माझ्यासाठी कसे राजी केले. तसेच अशिष नेहरा आणि मिथुन मिन्हांस यांनीसुद्धा मला पाठींबा दिला. त्यांना विसरून चालणार नाही.

2017 च्या रणजी मोसमात त्याने सातत्याने 140 किमी वेगाने गोलंदाजी करत सैनीने प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच सलग 10-12 षटकांचा स्पेल टाकने त्याची विशेषता आहे.

सैनीने खेळलेल्या 31 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 20.04 च्या सरासरीने 96 बळी मिळवले आहेत. तसेच 2018 च्या आयपीएल मोसमात बेंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाने त्याला 3 कोटी रूपयात करारबद्ध केले आहे.

सैनीचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक आहेत. वयाची शंभरीपार असलेले त्याचे आजोबा नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेचे सदस्य होते. ते ही क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. ते आजही भारताचे सामने पाहतात.

महत्त्वाच्या बातम्या- 

फिटनेसच्या कारणावरुन मोहम्मद शमीला भारतीय संघातून वगळले, या खेळाडूला मिळाली संधी!

सेहवागने षटकार मारण्यासाठी पाकिस्तानच्या कर्णधाराला बदलायला लावले क्षेत्ररक्षण!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment