---Advertisement---

तब्बल 75 वर्षांपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता पहिला कसोटी सामना

On: बुधवार, फेब्रुवारी 8, 2023 10:23 PM
BGT 2023 (Rohit Sharma pat Cummins)
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेची चर्चा सध्या संपूर्ण क्रिकेटविश्वात आहे. ही कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही कसोटी मालिका बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने ओळखली जाते. पण तुम्हांला कधी प्रश्न पडला आहे का की, या कसोटी मालिकेचे नाव कशावरुन पडले? कसोटी सामन्याची सुरुवात कधी आणि कशी झाली? चला तर आपण कसोटी मालिकेचा संपुर्ण इतिहास जाणुन घेऊया…

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) यांच्यातील कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ही कसोटी मालिका बॉर्डर-गावसकर (Border-Gavaskar Trophy) या नावाने ओळखली जाते. हे नाव ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू ऍलन बॉर्डर (Allen border) व भारताचे माजी कर्णधार, आघाडीचे फलंदाज सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या सन्मानार्थ दिले गेले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी इतिहास
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी इतिहासातील (India vs Australia Test series History) पहिला सामना 28 नोव्हेंबर 1947 रोजी सुरू झाला. या सामन्यात भारतीय संघाला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज हे दोन्ही संघ कट्टर प्रतिस्पर्धी असून यांचे सामने चाहते उतुस्कतेने पाहतात.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला सामना 75 वर्षांपूर्वी खेळला गेला होता. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. भारतीय संघ 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेन येथे झाला. भारतीय संघ इंग्लंडशिवाय दुसऱ्या देशाविरुद्ध कसोटी सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
28 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा सामना ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर झाला. भारतीय संघाची कमान लाला अमरनाथ यांच्या हातात होती, ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व महान फलंदाज डोनाल्ड ब्रॅडमन यांच्याकडे होते. येथे ब्रॅडमनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बॅडमॅनने केलेल्या 185 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 8 गडी गमावून 382 धावा केल्या आणि डाव घोषित केला होता. ब्रॅडमन यांच्याशिवाय किथ मिलर (58), लिंडसे हॅसेट (48) आणि आर्थर मॉरिस (47) यांनीही चांगली फलंदाजी केली. त्याचवेळी भारताकडून लाला अमरनाथने 4 आणि विनू मंकडने 3 बळी घेतले. चंदू सरवटेलाही एक विकेट मिळाली.

जेव्हा भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा फलंदाजी केली
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीनंतर भारतीय डावाला सुरुवात झाली तेव्हा पहिल्याच चेंडूवर विनू मांकड बाद झाला. सुरुवातच इतकी खराब झाली की गुल मोहम्मद (0) तत्काळ बाद झाला. भारतीय संघाने आपले दोन विकेट शून्यावर गमावले होते. यानंतर भारतीय फलंदाजांनी एक-दोन धावा करून डाव पुढे नेला. चंदू सरवटे (12), विजय हजारे (10) आणि लाला अमरनाथ (22) यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. संपूर्ण भारतीय संघ अवघ्या 58 धावांवर ऑलआऊट झाला.

येथे ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावातही भारतीय संघाची अवस्था अतिशय वाईट होती. सलामीवीर चंदू सरवटे एका टोकाला राहिले आणि दुसऱ्या टोकाकडून विकेट पडत राहिल्या. भारतीय संघ 98 धावांमध्ये सर्व गडी बाद झाले. सरवटे यांनी 26 धावा करून नववी विकेट पडली आणि तंबुत परतले. अशाप्रकारे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डावात 226 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतरच्या चार कसोटी सामन्यांपैकी भारताला तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे भारताने ही मालिका 0-4 अशी गमावली. (cricket history ind vs Aus first test series in 1947 brisbane)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

“मला त्या दोघांमधील टशन‌ पाहायचे आहे”, भारतीय दिग्गजाने व्यक्त केली इच्छा
‘भारतावर दबाव बनवायचा असेल तर…’, ऑस्ट्रेलियाला मिळाला मिचेल जॉन्सनचा गुरुमंत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---