---Advertisement---

आयसीसी रँकिंगमध्ये मोठी उलथापालथ, तिलक वर्मा-वरुण चक्रवर्तीला बंपर फायदा!

---Advertisement---

आयसीसी टी20 रँकिंग: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या दरम्यान, आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या वर्षीच्या टी20 क्रमवारीत अनेक बदल दिसून येत आहेत. विशेषतः टीम इंडियाचा स्टार फलंदाज तिलक वर्माने इतिहास रचला आहे. त्याने एका स्थानाची झेप घेतली आहे आणि यासह तो आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदने गोलंदाजीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत ट्रॅव्हिस हेड पहिल्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग सध्या 855 आहे. दरम्यान, तिलक वर्मा एका स्थानाने पुढे सरकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग आता थेट 832 वर पोहोचले आहे. तिलक वर्मा पहिल्यांदाच आयसीसी टी20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यानंतर त्याचे रेटिंग 844 पर्यंत पोहोचले होते. पण तिसऱ्या सामन्यात बाद झाल्यामुळे त्याचे रेटिंग 832 पर्यंत घसरली आहे. यानंतरही तो आता ट्रॅव्हिस हेडच्या खूप जवळ आला आहे आणि त्याच्या नंबर वन स्थानाला धोकाही वाढला आहे.

दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत फलंदाजीने चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला इंग्लंडचा सलामीवीर फिल साल्ट याला एका स्थानाचे नुकसान झाले आहे. तो आता 782 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या टॉप ५ मध्ये झालेला हा एकमेव बदल आहे. दरम्यान, भारताचा सूर्यकुमार यादव 763 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नाही. जोस बटलर 749 रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ सहाव्या क्रमांकावर बाबर आझम आणि सातव्या क्रमांकावर पथुम निस्सांका आहे.

अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास हार्दिक पांड्या पुन्हा एकदा अव्वलस्थानी पोहचला आहे. पांड्या आयसीसीच्या नवीन क्रमावारीनुसार 255 रेटिंगसह पहिल्यास्थानी विराजमान झाला आहे. या यादीत टाॅप-10 हार्दिक पांड्या केवळ एकटा भारतीय आहे. गोलंदाजांबद्दल बोलयाचे झाले तर, यामध्ये वरुण चक्रवर्तीला बंपर फायदा झाला आहे. आयसीसीच्या नव्या आकडेवारीनुसार वरुण 25 स्थानांची झेप घेत, पाचव्या क्रमाकावर पोहचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत केलेल्या कामगिरी फळ त्याला मिळाले आहे. वरुणच्या खात्यात 679 रेटिंग गुण जमा झाले आहेत. या यादीत इंग्लंडचा आदिल रशीद 718 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. वरुण व्यतिरिक्त अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई हे दोन गोलंदाज अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत.

 हेही वाचा-

IND vs ENG: हार्दिक पांड्याची ती चूक पडली महागात, नाही तर सामन्याचा निकाल वेगळा असता?
SL vs AUS; स्टीव्ह स्मिथचा भीमपराक्रम, खाते उघडताच रचला इतिहास, सचिन-द्रविडला टाकलं मागे
वरुण चक्रवर्तीने अश्विन आणि बिश्नोईचा विक्रम मोडला, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---