भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने 374 धावा केल्या. भारताविरुद्ध वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने केलेली ही सर्वाधिक धावसंख्या होती. या एका विक्रमाव्यतिरिक्तही काही विक्रमांची नोंद या सामन्यात झाली. मात्र एक मोठा विक्रम अवघ्या 7 धावांनी हुकला.
स्मिथ, फिंच यांनी झळकावली शतके
या सामन्यात दोन शतके पाहायला मिळाली. पहिले शतक ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने ठोकले. त्याने 124 चेंडूंत 114 धावा केल्या. यानंतर स्टीव्ह स्मिथने 66 चेंडूत 105 धावा केल्या.
अशी कामगिरी करणारा स्मिथ ठरला तिसरा खेळाडू
स्मिथने 62 चेंडूत शतक ठोकले. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात वेगवान शतक ठोकणारा स्मिथ तिसरा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर आहे.सन 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने 51 चेंडूंत शतक झळकावले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर जेम्स फॉकनर आहे. त्याने सन 2013 ला भारताविरुद्ध 57 चेंडूत शतक झळकावले होते.
An elite way to start the Dettol ODI series – particularly with the bat!
Our Aussies defeated India by 66 runs to take the first ODI in Sydney – well done lads! #AUSvIND pic.twitter.com/0FqSCirfIu
— Cricket Australia (@CricketAus) November 27, 2020
‘हा’ मोठा विक्रम अवघ्या 7 धावांनी हुकला
या सामन्यात भारताला 375 धावांच्या आव्हावाचा पाठलाग करताना 308 धावाच करता आल्या. या सामन्यात दोन्ही संघाच्या मिळून एकूण 682 धावा झाल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अवघ्या 7 धावांनी हुकला.
सन 2015 मध्ये ऑस्ट्रेलियामधील सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या वनडे सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला गेला होता. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या या सामन्यात 688 धावा झाल्या होत्या.
पंड्या, धवन यांनी ठोकली अर्धशतके
भारताकडून या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्या (90 धावा )आणि सलामीवीर शिखर धवन (74 धावा ) यांनी अर्धशतक ठोकले. मात्र बाकी फलंदाजांना खास कामगिरी करण्यात अपयश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
एकाच सामन्यात दोन धक्के! आयसीसीने टीम इंडियावर ठोठावला मोठा दंड
वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अवघ्या २० चेंडूत झळकावले अर्धशतक; एकाच षटकात ठोकले ४ षटकार
“विराटच्या अनुपस्थितीत ‘या’ फलंदाजाने यावे चौथ्या क्रमांकावर”, माजी क्रिकेटपटूचा सल्ला
ट्रेंडिंग लेख –
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके
आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’