टी२० क्रिकेटमध्ये सध्या सूर्यकुमार यादव नाव चांगलेच तळपत आहे. त्याला ३६० डिग्री खेळाडूही म्हटले आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर (WIvsIND) ५ टी२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सलामीला येताना त्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सुरूवातीला त्याने आक्रमक पवित्रा घेतला होता. तो मोठी खेळी करू शकला असता. त्याने केलेली खेळी मोठी नसली तरी त्याने १५०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्यामध्ये ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याने मारलेल्या त्या षटकाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
भारताचा डाव सुरू असताना सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने अल्झारी जोसेफच्या चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हा षटकार मारला आहे. त्याने मारलेल्या षटकाराचा शॉट पाहण्यासारखा होता. त्याचा हा षटकार अनेकांना एमएस धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटसारखा वाटला आहे. तसेच धोनीनेच या शॉटला प्रसिद्धी मिळवून दिली आहे. सध्या आपण रिषभ पंत, हार्दिक पंड्या यांनासुद्धा वारंवार हा शॉट मारताना पाहतो. मात्र धोनीच हा शॉट उत्तमरित्या मारू शकतो.
तसेच सूर्यकुमार अशाप्रकारचे उत्तम फटके मारण्यात प्रसिद्ध आहे. म्हणूनच त्याला भारताचा एबी डिविलियर्सही म्हटले जाते. याआधी झालेल्या वनडे मालिकेत तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने तीन सामन्यात १३, ९ आणि ८ अशा धावा केल्या होत्या.
Ridiculous shot from SKY 😮😮#IndvWIonFanCode #WIvIND
Credit: @DDNational pic.twitter.com/PrMDpu23eY— Torsades De pointes (@Gaurabeyyyyy) July 29, 2022
या सामन्यात सूर्यकुमार सलामीला आला तर मध्यम फळीत श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत हे फलंदाजीला आले होते. मात्र दोघांनीही लवकरच त्यांच्या विकेट्स गमावल्या. यामुळे जर सूर्यकुमार पुढील सामन्यातही सलामीला आला तर भारताची मध्यम फलंदाजीची जबाबदारी कोण सांभाळणार हा प्रश्नही महत्वाचा आहे.
भारताने सलामीला असा प्रयोग करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी रिषभ, विराट कोहली, रोहित शर्मा, इशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुड्डा यांनी सुद्धा सलामीला येऊन फलंदाजी केली आहे. तसेच भारतीय क्रिकेट बोर्ड आगामी टी२० विश्वचषकामुळे खेळाडूंच्या फलंदाजीच्या क्रमामध्ये बदल करून पाहत आहे. खेळाडूंच्या बदलत्या स्थानांमुळे टी२० विश्वचषकात कोणते खेळाडू कोणत्या क्रमांकावर खेळतील याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! कॉमनवेल्थ गेम्समधील भारताची ‘सिक्सर क्विन’ बनली हरमनप्रीत, व्हिडिओ व्हायरल
शर्माजी पुन्हा टी२०तील ‘टॉपर’, वेस्ट इंडिजविरुद्ध ताबडतोब अर्धशतक करत विश्वविक्रम नावावर
वॉर्नरला ‘या’ संघाने दिली तब्बल १७ कोटींची ऑफर?