इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन त्याच्या सोशल मिडीयावरील असभ्य वर्तनामुळे कायमच चर्चेत असतो.
आता इंग्लंडच्या या माजी कर्णधाराने स्वत:हून भारतीय क्रिकेट चाहत्यांचा रोष ओढावून घेतला.
भारतीय संघाने मॅंचेस्टर येथिल ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर मगळवारी (३ जुलै) पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ८ गड्यांनी विजय मिळवला होता.
या सामन्यात भारताच्या कुलदीप यादवने २४ धावात पाच बळी मिळवत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला होता.
या सामन्यानंतर मायकेल वॉनने एक खोडकर ट्विट केल्याने भारतीय चाहत्यांनी चांगलाच फैलावर घेतला.
“कुलदीप यादव इंग्लंड संघाची नक्कीच डोकेदुखी ठरला. भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा थोडासा चांगला आहे.” वॉन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला.
Kuldeep Yadav is causing absolutely chaos ……. The Indians are a little bit better than the Aussies ……. #ENGvIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 3, 2018
गेल्या महिन्यात इंग्लंडने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत ५-० असे तर एकमेव टी-२० सामन्यात १-० असे पराभूत करुन व्हाइट वॉश दिला होता.
मायकेल वॉनच्या या ट्विटवर भारतीय चाहत्यांनी वॉनच्याच भाषेत जोरदार प्रतुत्तर दिले.
https://twitter.com/samir26_01/status/1014202454693564417?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1014202454693564417&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Fcricket%2Findia-v-england-michael-vaughan-s-sarcastic-tweet-angers-indian-fans%2Fstory-7NGntaQd0tVatJLpuwcKMP.html
English are a little bit better than the Irish
— Pie (@Studiesareshit) July 3, 2018
Even the Scottish team defeated England few weeks ago.
— ritesh (@riteshbswl) July 3, 2018
He will say Scottish is lil better than English. These guys don't appreciate real talents not so open minded.
— Gokul Kanagasabai (@gokulpks) July 4, 2018
या सर्व प्रकरणानंतर मायकेल वॉनने भारतीय चाहत्यांची माफी मागितली.
“मला जाणीव आहे की भारतीय संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे. मला भारतीय संघाची चिंता वाटतेय. इंग्लंडने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया सोबत जे काही केले, तेच भारतीय संघाने आता इंग्लंड बरोबर केले आहे.” या शब्दात वॉनने भारतीय चाहत्यांना प्रतिसाद दिला.
Just realised India did to England what England have just done to Australia over the past few weeks !!! Looked more mysterious and very very well organised …… I am now officially concerned about the Indian White ball team … #Kuldeep #ENGvIND
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 4, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक- तगड्या ब्राझीलला बेल्जियमकडून पराभवाचा झटका
-२१ व्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचणारा फ्रान्स…