शनिवार दि. 23 जूनला भारतीय क्रिकेट संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे.
भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळुन इंग्लंड विरुद्ध तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे.
या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका भारतीय संघाबरोबर कर्णधार विराट कोहलीसाठी महत्वाची असणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेत चांगली कामगिरी करणारा विराट कोहली 2014 च्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत मात्र पूर्णपणे अपयशी ठरला होता.
2014 च्या कसोटी मालिकेत विराटला पाच कसोटीतील दहा डावात 13.40 च्या सरासरीने फक्त 134 धावा करता आल्या होत्या.
त्यानंतर जगभरातील विविध देशात चांगली कामगिरी करणारा विराट कोहली इंग्लंड दौऱ्यात कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पत्रकारांशी बोलताना विराट कोहली विषयी मोठे वक्तव्य केले आहे.
” विराट हा उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. तो या इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे. तो इंग्लंड दौऱ्यापूर्वी कौंटी क्रिकेट खेळला नाही हे बरे झाला. 2014 साली इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी न झ्याल्याने तो थोडासा घाबरला होता.” असे वक्तव्य माजी कर्णधार सौरव गांगुलीने केले.
“या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. मात्र हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे की इंग्लंड संघही सध्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारताचा हा दौरा अत्यंत. चुरशीचा होणार आहे. असेही गांगुली पुढे म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या:
– वर्षांपुर्वी याच दिवशी धोनी बनला होता जगातील सर्वात परिपुर्ण कर्णधार!
–माजी कर्णधार अनिल कुंबळे सुरु करतोय नवी इनिंग!