19 डिसेंबरला आयपीएलचा 2020 (IPL 2020) मधील 13 वा हंगामासाठीचा लिलाव (IPL Auction) पार पडला. या लिलावात बऱ्याच खेळाडूंना चांगली बोली लावत आयपीएल फ्रेंचायझींनी आपल्या संघात सामील करून घेतले.
मात्र या आयपीएल लिलावात भारतीय कसोटी संघातील खेळा़डू हनुमा विहारीवर (Hanuma Vihari) आयपीएलमधील एकाही फ्रेंचायझीने बोली लावली नाही. परंतु या गोष्टीवर जास्त लक्ष न देता तो न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी कसून मेहनत घेत आहे.
मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) विहारीला 2 कोटी रूपयात आपल्या संघात सामील केले होते. परंतु यावर्षी दिल्लीने मुक्त केल्यानंतर त्याने स्वत: ला 2020 आयपीएल लिलावासाठी 50 लाख रुपये या मुळ किमतीच्या वर्गात ठेवले होते.
“हे(आयपीएलमध्ये बोली न लागणे) माझ्या हातात नाही आणि मला यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. माझं काम फक्त सामन्यात खेळणे आणि सामना जिंकूण देणे एवढेच आहे,” असे बंगालविरुद्ध झालेल्या रणजी सामन्यानंतर विहारी म्हणाला.
“मी हैदराबाद (Hyderabad) संघाकडून (राज्य संघ) मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे जेव्हापण मला संधी मिळेल तेव्हा मी भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करेल,” असेही विहारी यावेळी म्हणाला.
विहारीने 74 ट्वेंटी20 सामन्यात 4 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. त्यामध्ये त्याचा 112.35 चा स्ट्राईक रेट आहे.
आता विहारी पुढील महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी भारत ‘अ’ (India ‘A’) संघाचे नेतृत्व करणार आहे. याबद्दल बोलताना विहारी म्हणाला की, “मी न्यूझीलंड दौऱ्याची तयारी करत आहे. मला भारत ‘अ’ संघासाठी 2 सामने आणि त्यानंतर कसोटी मालिकेत खेळायचे आहे.”
“ही मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण मालिका असेल. कारण, यानंतरचा दौरा ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) होईल. मी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व (Captaincy) करण्यास खूप उत्साहित आहे,” असे विहारी यावेळी म्हणाला.
विहारीने यापूर्वी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारत ‘अ’ संघाकडून न्यूझीलंड दौरा केला होता. त्यामुळे त्याला न्यूझीलंडमधील परिस्थितीबद्दल माहिती आहे.
“तेथील हवेचा फायदा स्विंग करणाऱ्या गोलंदाजांना होतो. हे आव्हानात्मक असेल. भारतीय ‘अ’ संघात सर्व खेळाडूंकडे चांगले तंत्र आहे. आमच्या फलंदाजी फळीने परदेशात चांगली कामगिरी केली आहे. तसेच आम्ही याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करू,” असे न्यूझीलंडमधील वातावरणाबद्दल बोलताना विहारी म्हणाला.
आता कॅप्टन कोहलीकडे आहे पुजाराच्या रुपात गोलंदाजीसाठी नवा पर्याय, पहा व्हिडिओ
वाचा-👉 https://t.co/nJAwvVCGAR👈
#म #मराठी #Cricket #TeamIndia #ViratKohli #CheteshwarPujara
— Maha Sports (@Maha_Sports) December 29, 2019
२०२० मध्ये कोहलीच्या टीम इंडियासमोर असणार या संघाचे तगडे आव्हान – सौरव गांगुली
वाचा- 👉 https://t.co/6RrOTmsvxA👈
#म #मराठी #Cricket #TeamIndia #ViratKohli #SouravGanguly
— Maha Sports (@Maha_Sports) December 29, 2019