---Advertisement---

KBC मध्ये ७ कोटी रुपयांसाठी विचारला क्रिकेटबद्दल अवघड प्रश्न, वाचा काय आहे उत्तर?

On: गुरूवार, नोव्हेंबर 26, 2020 4:13 PM
---Advertisement---

नवी दिल्ली। ‘कौन बनेगा करोडपती’ म्हणजे केबीसी हा भारतीय टेलिव्हिजन चॅनेलवरील एक लोकप्रिय शो आहे. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करतात. या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन मोठी रक्कम जिंकण्याची संधी स्पर्धकाकडे असते. अशाच प्रकारे यामध्ये एका स्पर्धकाला क्रिकेटसंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता.

अनुपा दास यांनी जिंकले होते 1 कोटी रुपये

केबीसीच्या 12 व्या हंगामात अनुपा दास या स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन त्या 1 कोटी रुपये जिंकल्या होत्या.

सात कोटी रुपयांसाठी विचारला क्रिकेटवरील प्रश्न

पुढचा प्रश्न सात कोटी रुपयांसाठी विचारला. या प्रश्नाला जॅकपॉट प्रश्न असेही म्हणतात. अमिताभ बच्चन यांनी अनुपा यांना क्रिकेटशी संबंधित जॅकपॉट प्रश्न विचारला. सात कोटी रुपये जिंकण्यासाठी या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे होते. अमिताभ बच्चन यांनी विचारले की, “आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये रियाज पूनावाला आणि शौकत दुकानवाला यांनी कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे? या प्रश्नाला पुढीलप्रमाणे चार पर्याय देण्यात आले होते. अ) केनिया ब) युएई क) कॅनडा ड) इराण.

अनुपा यांनी घेतला शो सोडण्याचा निर्णय

अनुपा यांना या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते, म्हणून त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला.

अनुपा यांनी दिले अचूक उत्तर

मात्र शो सोडण्याच्या आधी स्पर्धकाला प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे अनुपा यांनी पर्याय क्रमांक ब म्हणजेच युएई हे उत्तर दिले. यूएई हे अचूक उत्तर होते. परंतु अनुपा यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या सात कोटी रुपये जिंकू शकल्या नाहीत.

अनुपा या हंगामातील तिसऱ्या करोडपती

छत्तीसगडमधील जगदलपूरहून आलेल्या अनुपा दास शिक्षिका आहेत. त्यांनी केबीसीमधून एक कोटी रुपये जिंकले. केबीसीच्या या हंगामात करोडपती होणाऱ्या त्या तिसऱ्या स्पर्धक आहेत.

याआधी हे स्पर्धक ठरले करोडपती

सर्वप्रथम, दिल्लीची नाझिया नाझीम केबीसीच्या या हंगामातील करोडपती ठरली. आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा दुसरी करोडपती ठरली होती. मोहिता हिमाचल प्रदेशची रहिवासी होती आणि जम्मू-काश्मीर येथे नोकरी करत होती.

महत्त्वाच्या बातम्या-

“यष्टीरक्षकांसाठी धोनी एक आदर्श, भूमिका कशी पार पाडायची हे त्याने दाखवून दिलं“

‘मी पावर हीटिंग करू शकत नाही’, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्याआधी भारताच्या स्टार फलंदाजाचे मोठे वक्तव्य

लंका प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात कोलंबो किंग्ज-कँडी टस्कर्स आमने सामने, इरफानच्या कामगिरीवर लक्ष

ट्रेंडिंग लेख-

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर

ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---