भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला २०१८ मध्ये आयपीएल दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीकडून एक खास भेट मिळाली होती. श्रीकांतला धोनीने त्याची स्वाक्षरी केलेली आणि एक संदेश लिहेलेली बॅट भेट म्हणून दिली होती.
याबद्दल श्रीकांतने सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद झाल्याचे म्हटले होते. तसेच तो क्षण त्याच्यासाठी फॅनमॉमेंन्ट असल्याचेही म्हटले होते.
या बॅटचा फोटो श्रीकांतने सोशल मेडियावर शेयर केला होता. त्याचबरोबर त्याला कॅप्शन देताना म्हटले होते की ” या भेटीसाठी धन्यवाद धोनी. मी किती आनंदी आहे हे सांगू शकत नाही. या बॅटमुळे माझा दिवस चांगला झाला. ”
Thank you @msdhoni for the wonderful gift and can’t tell how happy I am. This just made my day.🤩😁 #MSDhoni #fanmoment pic.twitter.com/0wJhiOsaFW
— Kidambi Srikanth (@srikidambi) May 20, 2018
याधीही चेन्नई सुपर किंग्जकडून श्रीकांतला धोनीची 7 क्रमांकाची जर्सी भेट म्हणून देण्यात आली होती.
Thank you Chennai Super Kings for the tshirt. Let’s get this today. pic.twitter.com/0lQEMIATmh
— Kidambi Srikanth (@srikidambi) April 30, 2018
सध्या जागतिक क्रमवारीत श्रीकांत चौदाव्या क्रमांकावर आहे. २०१७ मध्ये श्रीकांत जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने त्यावर्षी फ्रेंच ओपन सुपरसिरीज, इंडोनेशिया ओपन (जून), ऑस्ट्रेलिया ओपन (जून) आणि डेन्मार्क ओपन (ऑक्टोबर) या ४ सुपर सिरीज स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यावेळी तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू बनला होता, ज्याने एका वर्षात चार किंवा त्यापेक्षा जास्त सुपर सिरीज जिंकण्याची किमया केली.