बंगाल क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या 6 संघांमध्ये होणाऱ्या ‘बंगाल टी 20 चॅलेंज’ स्पर्धेमार्फत 24 नोव्हेंबरला ईडन गार्डन्सवर क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 10 डिसेंबर रोजी होणार आहे. आयोजकांनी सर्व आरोग्य नियमांसह स्पर्धेसाठी बायो-बबलचे वातावरण तयार केले आहे.
मोहन बगान आणि पूर्व बंगालशिवाय कालिघाट, टाऊन क्लब, तपन मेमोरियलचे संघदेखील स्पर्धेच्या सुरुवातीच्या हंगामात विजेतेपदासाठी आव्हान देतील. या स्पर्धेत एकूण 33 सामने खेळले जातील, यात संघांनी 15 खेळाडू निवडले आहेत. त्यातील 7 खेळाडू रेटेन केले आहेत, तर 8 खेळाडूंना ड्राफ्टमधून घेतले आहे. सोबतच 4 खेळाडू राखीव आहेत. मनोज तिवारी, अनस्तूप मजूमदार, शाहबाज अहमद आणि श्रीवत्स गोस्वामी असे स्टार खेळाडूही या स्पर्धेत खेळणार आहेत.
बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरनला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो दोन आठवड्यांसाठी क्वारंटाईनमध्ये असणार आहे. कॅबचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर सांगितले की, “या स्पर्धेत अंतिम आणि उपांत्य फेरीसह एकूण 33 सामने खेळले जातील. ईडन गार्डन्स येथे सामने दिवस-रात्र खेळले जातील. स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सामनाधिकारी बायो- बबलमध्ये असतील.”
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गजाने निवडलेल्या परदेशी खेळाडूंच्या आयपीएल संघात स्टोक्सला डच्चू; ‘हा’ आहे कर्णधार
दक्षिण आफ्रिका-इंग्लंड क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; खेळाडू आढळला पॉझिटिव्ह
विराट कोहलीचे मोठे मन! महाराष्ट्रातील दहा हजार कुपोषित मुलांच्या मदतीसाठी केला हात पुढे
ट्रेंडिंग लेख-
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी