भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) सध्या आपल्या खराब कामगिरीमुळे कठीण परिस्थितीमध्ये आहे. परंतु पंतबरोबर 2014 आणि 2016मध्ये 19 वर्षाखालील विश्वचषक खेळणारा त्याचा मित्र सरफराज खान (Sarfaraz Khan) रणजी ट्रॉफीत दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे.
आजपासून (27 जानेवारी) हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (Himachal Pradesh Cricket Association Stadium), धरमशाला (Dharamsala ) येथे रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेतील सातव्या फेरीत मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश (Mumbai vs Himachal Pradesh) संघात सामना सुरु झाला आहे.
या सामन्यात पहिल्या दिवशी मुंबईकडून पहिल्या डावात सरफराज खानने द्विशतक पूर्ण केले आहे. त्याने पहिल्या दिवसाखेर 213 चेंडूत नाबाद 226 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 षटकार आणि 32 चौकारांचा समावेश आहे.
यापूर्वी उत्तर प्रदेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात सरफराजने 391 चेंडूत 76.98 च्या स्ट्राईक रेटने 301 धावा केल्या होत्या.
सध्या सुरु असलेल्या मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 71 धावांवरच चौथी विकेट गमावली होती. पण नंतर सरफराज खानने त्यांचा डाव सांभाळला.
कर्णधार आदित्य तरेबरोबर (Aditya Tare) 143 धावांची भागीदारी केली. आदित्य 100 चेंडूत 62 धावा करुन बाद झाला. यावेळी मुंबईचा संघ 5 बाद 214 धावांवर होता. यानंतर सरफराजने शुभम रांजणेसोबत (Shubham Ranjane) डाव पुढे नेला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबईनेे 5 बाद 372 धावा केल्या होत्या. यावेळी सरफराज आणि शुभमने मिळून नाबाद 158 धावांची सहाव्या विकेटसाठी भागीदारी केली आहे.
सरफराजने रणजी ट्रॉफीच्या मागील दोन सामन्यांमध्ये आतापर्यंत 500 पेक्षा अधिक धावांचा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे सरफराज या दोन्हीही सामन्यांमध्ये बाद झालेला नाही.
आयपीएलमध्ये विराट कर्णधार असलेल्या आरसीबीकडून खेळला आहे सरफराज –
सरफराजने आयपीएलमध्ये (IPL) विराट कोहली (Virat Kohli) नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये त्याने 33 सामन्यांमध्ये 27.2 च्या सरासरीने आणि 142.66 च्या स्ट्राईक रेटने एकूण 408 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 अर्धशतकाचा समावेश आहे.
2019 च्या आयपीएलमध्ये सरफराज किंग्स इलेव्हन पंजाबकडून 8 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यामध्ये त्याने 45 च्या सरासरीने आणि 125.87 च्या स्ट्राईक रेटने 180 धावा केल्या होत्या.
काय सांगता! चक्क मार्टिन गप्टिलने युजवेंद्र चहलला हिंदीतून दिली शिवी, पहा व्हिडिओ
वाचा👉https://t.co/MVb4rknSdQ👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @Martyguptill @yuzi_chahal— Maha Sports (@Maha_Sports) January 27, 2020
मांजरेकर-जडेजामध्ये पुन्हा एकदा ट्विटरवर शाब्दिक चकमक, वाचा-
वाचा👉https://t.co/lCmUxhk7P2👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @imjadeja @sanjaymanjrekar— Maha Sports (@Maha_Sports) January 27, 2020