भारत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफी कदाचित सहभाग घेणार नाही. असा संशय व्यक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे माजी अध्यक्ष खलिद महमूद यांनी केले आहे. ते म्हणाले की, भारत जर पाकिस्तानात नाही आला तर त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तसेच आयसीसी दोघानांही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पीसीबीच्या माजी अध्यक्ष म्हणाले, “टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी राजी होण्याची शक्यता खूप कमी आहे”.
पुढे बोलताना ते म्हणाले, जर भारतीय संघ न आल्याने दुसरे क्रिकेट देश देखील असे करु शकतात, त्यामुळे स्पर्धेचे आयोजन आणि त्यातून होणारा नफा अडचणीत येईल. महमूद म्हणाले, ‘भारत जगामध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. ज्यामुळे त्यांचा दबदबा अधिक आहे. जर भारत आपले संघ पाठवणार नसतील, तर मला वाटते श्रीलंका अफगाणिस्तान आणि बांंग्लादेश सारखे देश देखील असंच करतील.
महमूद म्हणाले, ‘चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचे आहे. पाकिस्तानने भारताशिवाय या स्पर्धेचे आयोजन केल्यास त्यांच्यावर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे’. अशा परिस्थितीत महमूदने पीसीबीला खेळांना राजकारणापासून वेगळे ठेवण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा सल्ला दिला जेणेकरून अधिक समस्या उद्भवू नयेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सल्ला देताना महमूद म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत आम्ही फक्त लॉबिंग करू शकतो आणि इतर बोर्डांना आमच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करू शकतो. आयसीसीमध्ये भारताचा मोठा दबदबा आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने प्रत्युत्तराची कारवाई करणे चांगले होणार नाही.
तो म्हणाला, ‘गोष्ट अशी आहे की जेव्हा बीसीसीआय म्हणतो की ते आपला संघ पाठवू शकत नाही आणि त्याचे सामने पाकिस्तानबाहेर खेळेल, तेव्हा ते पाकिस्तानसाठी आयसीसी कार्यक्रम आयोजित करण्याच्या उद्देशाला कमी करते. चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हीव्हीएस लक्ष्मणला आयपीएलमध्ये मिळू शकते मोठी जबाबदारी, या संघाकडून मिळणार ऑफर!
“अभिनेत्रीशी नाते, शरीरावर टॅटू आणि…” टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी दिग्गजानं दिला युवा खेळाडूंना अनोखा सल्ला
शेवटच्या सामन्यात शतक…तरीही संजू सॅमसनला संघातून का वगळलं?