भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताचा दारुण पराभव झाला आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले. दुसऱ्या डावात भारताने दिलेल्या 107 धावांचा पाठलाग करताना किवी संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 षटकात पूर्ण केले. या विजयासह न्यूझीलंडने 35 वर्षांनंतर भारतात पहिला विजय नोंदवला. आता तीन सामन्यांचा कसोटी मालिकेत न्यूझीलंड आता 1-0 ने पुढे आहे.
वास्तविक, टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून पहिल्या डावात निराशाजनक कामगिरी झाली. संघाने केवळ 46 धावा केल्या. भारतीय फलंदाज पाहुण्या संघाच्या गोलंदाजांसमोर पूर्णपणे झगडताना दिसले. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 462 धावा करत 356 धावाची अभेद्य आघाडी घेतली. ज्यामध्ये भारतीय वंशच्या रचिन रवींद्रने शानदार शतक झळकावले.
🚨 HISTORY AT CHINNASWAMY 🚨
NEW ZEALAND DEFEATED INDIA IN INDIA IN A TEST AFTER 36 YEARS. pic.twitter.com/NgMY7KT1YX
— Johns. (@CricCrazyJohns) October 20, 2024
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारताने पलटवार केले. टीम इंडियाने न्यूझीलंडच्या 356 धावांचे आघाडी मोडून काढले. पण भारताला मोठे लक्ष्य देता आले नाही. आघाडीशी बरोबरी केल्यानंतर भारताला केवळ 107 धावा करता आल्या. एकेकाळी सर्फराज खान आणि रिषभ पंत दोघेही खेळताना असे वाटत होते की, भारत आरामात सामना जिंकेल किंवा ड्राॅ करेल. मात्र तसे झाले नाही. ज्याचे कारण असे की, न्यूझीलंडने दुसऱ्या डावात घेतलेल्या नवीन चेंडूवर खेळताना भारतीय फलंदाजांचे धागे दणाणले. किवी संघाच्या वेगवान गोलंदाजांसमोर टीम इंडिया संघर्ष करताना दिसली. शेवटी दुसऱ्या डावात भारत केवळ 462 धाव करु शकला. ज्यामध्ये सर्फराजने (150) शनदार झळकावले.
भारताने दिलेल्या 107 धावांचे माफक लक्ष्य न्यूझीलंडने 32 व्या षटकात पूर्ण केले. ज्यामध्ये विल यंगने सर्वाधिक 48* धावा केल्या. तर गोलंदाजीत केवळ जसप्रीत बुमराहने 2 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडसाठी हा सामना ऐतिहासिक ठरला कारण संघाने तब्बल 35 वर्षांनंत भारतीय भूमीवर विजय मिळवला. शेवटच्या वेळी 1988 मध्ये न्यूझीलंडने भारतात सामना जिंकला होता.
हेही वाचा-
झिम्बाब्वेचा भीमपराक्रम! भारताचा मोठा रेकॉर्ड अगदी थोडक्यात वाचला
निवडकर्ते लक्ष द्या…ऋतुराज गायकवाडनं ठोकलं आणखी एक शतक! आता तरी संधी मिळणार का?
जगाला मिळणार नवा टी20 चॅम्पियन, या दोन संघांमध्ये विजेतेपदाची टक्कर