भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज (04 ऑगस्ट) खेळवला जात आहे. तर या सामन्यात श्रीलंकेनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय संघ पहिल्या डावात गोलंदाजी उतरणार आहे. वास्तविक, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना टाय झाल्याने आजचा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक सामना असणार आहे.
श्रीलंकेने आजच्या सामन्यात प्लेइंग मध्ये दोन खेळाडूंना स्थान दिले आहे. कारण वनिंदू हसरंगा दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडला आहे. जेफ्री वेंडरसे आणि कामिंदू मेंडिस या दोन गोलंदाजांंना प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली आहे. तर भारतीय संघ शेवटच्या सान्यातील प्लेइंग 11 सोबतच मैदानात उतरला आहे.
पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंका: चरिथअसालंका (कर्णधार) पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चारिथ , कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे
पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकात 230/8 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना एकेकाळी मजबूत स्थितीत असलेली टीम इंडिया आखेर 47.5 षटकांमध्ये 230 धावांवर सर्वबाद झाली. अशा प्रकारे दोन्ही संघांचे गुण समान राहिले आणि सामना बरोबरीत सुटला.
हेही वाचा-
Paris Olympics: भारतासाठी सुपर संडे! लक्ष्य सेनसह हाॅकी संंघ मैदानात, पाहा संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक
ईशान किशन क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज, लवकरच करणार या संघातून पुनरागमन
पहिला सामना टाय, दोन्ही संघांसाठी ‘मालिका करा किंवा मरा’ स्थितीत, पाहा कोणाचं पारडं जड?