काही दिवसांपूर्वीच आयसआयस या दहशतवादी संघटनेने न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर हल्ल्याचा धमकीचा संदेश दिला होता. असे सांगण्यात आले की हा ‘लोन वुल्फ’ हल्ला असेल, जो एका टीमद्वारे नाही तर एकट्या व्यक्तीद्वारे केला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नाहीत, त्यामुळे दहशतवादी अफवा पसरताच न्यूयॉर्कमधील प्रत्येक ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले. विशेषत: नासाउ काउंटी स्टेडियमच्या आजूबाजूला कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. आता नासाउ काउंटीचे पोलीस आयुक्त पॅट्रिक रायडर यांनी सुरक्षेबाबत एक मोठा अपडेट दिला आहे.
नासाउ काउंटीचे पोलिस आयुक्त पॅट्रिक रायडर म्हणाले, “आम्ही सुरक्षा परिस्थितीवर करडी नजर ठेवून आहोत. आम्हाला माहिती पुरवणाऱ्या आमच्या भागीदारांशी आम्ही सतत संपर्कात आहोत. आम्ही गुप्तचरांवरही लक्ष ठेवून आहोत, असे म्हणता येईल की सध्या सुरक्षा व्यवस्था चोख आहे. मैदानावर कडक निर्बंध लागू करण्यात आले असून मैदानाच्या आत जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
ज्यांच्याकडे तिकीट नाही त्यांना मैदानाजवळील सीडर पार्कमध्ये मोठ्या स्क्रीनवर वॉच पार्टी दरम्यान थेट सामन्याचा आनंद घेता येईल. मात्र सीडर पार्कमध्येही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लोक सिडर पार्कमध्ये बसण्यासाठी पिशव्या, कुलर आणि खुर्च्या आणू शकतात. पार्कमध्ये ठिकठिकाणी सुरक्षा चौक्या लावण्यात आल्या आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ला करण्याच्या कटामुळे मोठा निर्णय घेण्यात आल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. रविवारी सामना खेळला जात असताना हा परिसर नो फ्लाय झोन बनला आहे.
महत्तवाच्या बातम्या-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी, भारतीय खेळाडूंची युवराज सिंग सोबत डिनर पार्टी! फोटो व्हायरल
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी भारत करणार का संघात बदल?
बाबर आझमच्या नावावर लज्जास्पद विक्रमाची नोंद!