भारतीय क्रिकेट संघाला या वर्षाच्या पुढील दिवसांत एकही एकदिवसीय सामना खेळायचा नाही. मात्र, भारतीय संघ सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी आणि टी20 मालिका खेळणार आहे. या बातमीद्वारे जाणून घेऊयात आगामी काळातील आयपीएल 2025 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक कसे आहे.
सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी आणि टी20 मालिका
19 सप्टेंबरपासून भारतीय संघाला बांग्लादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 19 ते 13 सप्टेंबर दरम्यान चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. तर 6 ऑक्टोबर 9 ऑक्टोबर आणि 12 ऑक्टोबरला टी20 सामने खेळवले जातील.
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका
16 ऑक्टोबरपासून टीम इंडिया बंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. यानंतर 24 ऑक्टोबरपासून पुण्यात दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मालिकेतील शेवटचा आणि तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून वानखेडेवर खेळवला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार सामन्यांची टी20 मालिका
टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये चार सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया 8 नोव्हेंबरला पहिला टी20, 10 नोव्हेंबरला दुसरा टी20, 13 नोव्हेंबरला तिसरा टी20 आणि 15 नोव्हेंबरला चौथा टी20 खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची कसोटी मालिका
टीम इंडिया 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दुसरी कसोटी 30 नोव्हेंबरपासून, तिसरी कसोटी 6 डिसेंबरपासून, चौथी कसोटी 14 डिसेंबरपासून आणि पाचवी कसोटी 26 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे.
इंग्लंड विरुद्ध मालिका
22 जानेवारीपासून टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. पहिला टी20 22 जानेवारी, दुसरा टी20 25 जानेवारी, तिसरा टी20 28 जानेवारी, चौथा टी20 31 जानेवारी आणि पाचवा टी20 2 फेब्रुवारीपासून खेळवला जाईल.
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे. मात्र 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे, परंतु टीम इंडियासाठी पाकिस्तानमध्ये जाणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपले सामने दुसऱ्या देशात खेळू शकण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-
भारताला मिळाला नवा ‘युवराज सिंग’,6 चेंडूत सलग 6 षटकार मारून केला कहर
यॉर्कर टाकणाऱ्या सर्वात धोकादायक गोलंदाजांची यादी समोर; दोन भारतीयांचा समावेश
या शॉर्ट बॉलचं करावं तरी काय! श्रेयस अय्यरची जुनी समस्या पुन्हा एकदा उघड






