टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गाैतम गंभीरने शानदार सुरुवात केले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंका विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने विजय मिळवला. राहुल द्रविडने टी20 विश्वचषकाच्या यशानंतर मुख्य पदाचा राजीनामा दिला होता त्याच्यानंतर गाैतम गंभीरला ही जबाबदारी मिळाली आहे. आयपीएल 2024 मध्ये गाैतम गंभीरच्या मेंटाॅरपदामध्ये केकेआरने खिताब जिंकला होता. तथापि, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि 2007 चा टी-20 विश्वचषक विजेता जोगिंदर शर्माचा विश्वास आहे की गंभीर जास्त काळ मुख्य प्रशिक्षक म्हणून राहू शकणार नाही.
जोगिंदर शर्मा म्हणतो की, गौतम गंभीरचे खेळाडूंशी मतभेद असू शकतात. शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टदरम्यान तो म्हणाला, ‘गौतम गंभीर संघाची धुरा सांभाळणार आहे पण मला विश्वास आहे की गौतम गंभीर फार काळ टिकू शकणार नाही. कारण गौतम गंभीरचे स्वतःचे काही निर्णय असतात. एखाद्या खेळाडूसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. मी विराट कोहलीबद्दल बोलत नाहीये. गौतम गंभीरचे निर्णय अनेकदा असे असतात की इतरांना ते आवडत नाहीत.
2007 मध्ये भारताच्या टी20 विश्वचषक विजयात शेवटचे षटक टाकणारा जोगिंदर म्हणाला, ‘गौतम गंभीर सरळ बोलणारा आहे. तो त्याचे काम निस्वार्थपणे करेल. तो खऱ्या मनाने आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावतो.
गाैतम गंभीरला भारतीय मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी 2027 पर्यंत मिळाली आहे. भारतीय संघाला या दरम्यान चार आयसीसी स्पर्धा खेळायचे आहे. ज्यामध्ये 2027 चा एकदिवसीय विश्वचषक सामिल आहे. भारतीय संघामध्ये अनेक बदल होत आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 फाॅरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आशा परिस्थितीत एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाला नव कर्णधार शोधावे लागणार आहे. या कारणामुळे गंभीरवर मोठी जबाबदारी असणार आहे.
हेही वाचा-
भारत-श्रीलंका सामन्यात सुपर ओव्हर व्हायला हवी होती, आयसीसीचा नवा नियम अंपायर विसरलेत का?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बॉक्सरसोबत चीटिंग झाली? पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Paris Olympics: भारतासाठी सुपर संडे! लक्ष्य सेनसह हाॅकी संंघ मैदानात, पाहा संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक