नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत रोहित शर्माने मोठी झेप घेतली आहे. 37 वर्षीय रोहित शर्माने आयसीसी क्रमवारीत मोठे स्थान मिळवले आहे. त्याने आयसीसीच्या वनडे क्रमवारीत दुसरे स्थान गाठले आहे. भारतीय कर्णधार गेल्या काही काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही रोहित शर्माने शानदार खेळी खेळली होती, परिणामी रोहितला या शानदार कामगिरीचा फायदा आता ताज्या आयसीसी वनडे क्रमवारीत मिळाला आहे. दुसरीकडे, टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिलसाठी श्रीलंका दौरा काही खास नव्हता, त्यामुळे त्याला क्रमवारीत नुकसान सहन करावे लागले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने 58 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 64 धावा केल्या. यानंतर मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत भारतीय कर्णधाराने 35 धावांची खेळी केली. विराट कोहलीपासून सुरू झालेल्या या मालिकेत जवळपास सर्वच भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले, पण रोहितने अप्रतिम खेळी साकारली होती.
आयसीसी क्रमवारीत शुबमन गिलला नुकसानाचा सामना करावा लागला आहे. गिलसाठी श्रीलंका दौरा काही खास नव्हता. त्यामुळे गिल आता दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. सध्या गिलचे आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत 763 रेटिंग गुण आहेत. तर विराट कोहली 746 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धही त्याचीही खास कामगिरी नव्हती. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम अजूनही आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. बाबर 824 रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, केशव महाराज गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. कुलदीप यादव चौथ्या, जसप्रीत बुमराह 8व्या आणि सिराज 5 स्थानांच्या घसरणीसह 10व्या स्थानावर पोहचला आहे. सांघिक क्रमवारीत, ऑस्ट्रेलिया नंबर 1 कसोटी संघ कायम आहे तर वनडे आणि टी-20 मध्ये भारताचे वर्चस्व कायम आहे.
हेही वाचा-
कोण आहे इयान बेल? ज्याच्यावर श्रीलंकेने इंग्लंडला हरवणयासाठी दिली मोठी जबाबदारी
काैतुकास्पद…!! श्रीजेशसोबत त्याची 16 क्रमांकाची जर्सीही निवृत्त, हॉकी इंडियाची मोठी घोषणा
“पाकिस्तान क्रिकेट संघाला मिळाला गाैतम गंभीर सारखाच हेड कोच”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा मोठा दावा