---Advertisement---

रोहित शर्मा ‘नॉर्मल बॉलर’ म्हंटलेला, आता सहा वर्षांनी पाकिस्तानी गोलंदाजाचे प्रत्युत्तर

Rohit-Sharma-1
---Advertisement---

पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने रोहित शर्माने ६ वर्षांपूर्वी केलेल्या एका विधानाला उत्तर दिले आहे. कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान अशा टी-२० विश्वचषकाचा सामना खेळला गेला होता. आमिरसाठी हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन होते. असा हा महत्वाचा सामना सुरू होण्यापूर्वी रोहित शर्माने आमिरचा एक साधारण गोलंदाज म्हणून उल्लेख केला होता. रोहितच्या त्या प्रतिक्रियेविषयी आमिरने आता स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.

माध्यमांशी बोलताना पाकिस्तानचा दिग्गज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) म्हणाला की, “मी रोहित शर्माला गांभीर्याने घेत नाही. प्रत्येख खेळाडूचे स्वतःचे मत असते. त्यामुळे रोहितच्या वक्तव्याला एक निगेटिव्ह वक्तव्य म्हणून पाहणे योग्य नाही. जागतिक क्रिकेटमधील खूप फलंदाजांनी मला विश्वस्तरीय गोलंदाज म्हटले आहे, पण रोहितचे मत वेगळे आहे. मला नाही वाटत की, यात काही चुकीचे आहे. एक प्रोफेशनल क्रिकेटरच्या रूपात रोहितचे हे स्वतःचे वैयक्तिक मत आहे.”

“तुम्ही प्रत्येक खेळाडूचे आवडते बनू शकत नाही. यात काहीच शंका नाही की, रोहित शर्मा (Rohit Sharma) जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मी त्याला जेव्हा कधी गोलंदाजी केली आहे, त्याला माझा चेंडू खेळताना अडचण आली आहे. तरीपण तो माझ्यासाठी सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.” असेही आमिर पुढे बोलताना म्हणाला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०१६ साली झालेल्या या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला होता की, “त्याच्या (मोहम्मद आमिर) बोलनं बंद करा. तो एकटा गोलंदाज नाहीये, पाकिस्तानकडे पाच इतर गोलंदाजही आहेत, जे त्यांच्यासाठी चांगले प्रदर्शन करत आहेत. मला नाही वाटत की, एका सामन्यानंतर त्याला खूप जास्त प्रसिद्धी दिली पाहिजे. तो चांगला आहे, पण त्याला हे वारांवार सिद्ध कराणे गरजेचे आहे. आता लोक त्याची तुलना वसीम अकरमसोबत करू लागले आहेत. तो फक्त एक साधारन गोलंदाज आहे. त्यादिवशी जर चांगला खेळला असेल, तर चांगला आहे.”

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानला ५ विकेट्सच्या नुकसानावर १८८ धावांवर रोखले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १५.५ षटकात आणि ४ विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला होता. रोहित शर्मा अवघ्या १० धावा करून मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर बाद झाला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

महिला सुपर सिक्समध्ये पुणेरी वॉरियर्सची विजयी सलामी

संजू सॅमसनने ‘या’ चुका केल्या नाहीतर तो संघात टिकेल, भारताच्या दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला

महिला हॉकी विश्वचषक: भारतीय संघ जाहीर, राणीला वगळले तर ‘ही’ करणार भारताचे नेतृत्व

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---