ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाॅटिंगने मगील महिन्यात आयपीएलमधील दिल्ली फ्रँचायझी सोबत असलेले नाते तोडले. तो दिल्ली कॅपिटल्सचा मागील 7 वर्षापासून मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याच्या कार्यकाळात दिल्ली कॅपिटल्स संघाला एकदा पण ट्राॅफी जिंकण्यात यश आले नाही. दिल्ली 2020 मध्ये आयपीएल ट्राॅफीच्या एक पाऊल जवळ पोहचली होती. परंतु अंतिम सामन्यात मुंबई इंडिन्सकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
आता या दरम्यान माजी प्रशिक्षकाने दिल्लीपासून दूर झाल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की फ्रँचायझी एका आश्या प्रशिक्षकाच्या शेधात आहे. जो ऑफ- सीजन दरम्यान जास्तीत जास्त वेळ देऊ शकेल. त्याचप्रमाणे रिकी पाॅटिंगने असा इशारा देखील दिला आहे की, आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा हेड कोच भारतीय होऊ शकतो.
आयसीसीच्या रिले पाॅडकास्टमध्ये बोलताना पॉटिंग म्हणाला, जर तुम्ही पाहाल तर ते (दिल्ली) भारतीय हेड कोच सोबत जाण्याची शक्यता आहे. मी त्यांच्याशी केलेल्या संभाषणांपैकी हे नक्कीच होते. दिल्लीने स्पष्ट केले होते की त्यांना अशा एखाद्या प्रशिक्षकाची गरज आहे. जो त्यांना खेळण्यासाठी थोडा अधिक वेळ देऊ शकेल आणि ऑफ-सीझनमध्ये थोडी अधिक उपलब्ध असेल. त्यामुळे मी माझ्या इतर वचनबद्धतेमुळे ते करू शकलो नाही.
वास्तविक आता दिल्लीसोबत वेगळे झाल्यानंतर पॉटिंग आयपीएलमध्ये कोचिंग देण्यासाठी उत्सुक आहे. त्याला पुन्हा या पदावर यायचे आहे. तो म्हणाला, “मला पुन्हा आयपीएलमध्ये प्रशिक्षक व्हायला आवडेल. मी प्रत्येक वर्षी येथे चांगला वेळ घालवला आहे, मग ते माझे खेळाडू म्हणून सुरुवातीचे दिवस असोत किंवा मुख्य प्रशिक्षक म्हणून मी मुंबईत घालवलेले काही वर्ष असो.”
पॉटिंग म्हणाला, “दुर्दैवाने मी सात हंगामात दिल्लीसोबत राहिलो आहे मला आणि फ्रँचायझीला हवे होते तसे कामगिरी करत आले नाही. संघासाठी ट्रॉफी जिंकणे हे आमचे उद्दिष्ट होते पण ते होऊ शकले नाही याची खंत आहे. असे तो म्हणाला.
हेही वाचा-
“गप्प बसता, लाज नाही वाटत…”, बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचारांवर पाकिस्तानी क्रिकेटपटू संतप्त
धोनी आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार? आर अश्विनची प्रतिक्रिया चर्चेत
ढोल-ताशा आणि डान्स, भारतीय हॉकी संघाचं मायदेशात अश्या पध्दतीनं स्वागत! पाहा VIDEO