---Advertisement---

हा खेळाडू बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खळबळ माजवणार; शेन वॉटसनची मोठी भविष्यवाणी

Rishabh-Pant
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याबाबत आतापासूनच चर्चा रंगली आहे. याबाबत सातत्याने वक्तव्ये येत आहेत. या संदर्भात ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसननेही मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. वॉटसनच्या मते, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतची बॅट आग ओकणार आहे.

जेव्हा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानात कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम भारताने केला. तेव्हा रिषभ पंतचे योगदान महत्त्वाचे होते. गाबा कसोटी सामन्यात रिषभ पंतने उत्कृष्ट खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पंतही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. अलीकडेच त्याने बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. रिषभ पंत प्रदीर्घ काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. पण तरीही त्याने जबरदस्त फलंदाजी केली.

शेन वॉटसनच्या मते, यावेळीही रिषभ पंत भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीगच्या शुभारंभप्रसंगी बोलताना तो म्हणाला, “ऋषभ पंतकडे गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच्या चांगल्या आठवणी आहेत. विशेषत: त्याने फलंदाजीत ज्या प्रकारे कामगिरी केली. गाबा कसोटी सामन्यात त्याने खेळलेली खेळी खूपच चमकदार होती. सर्व आव्हानांवर मात करत त्याने पुन्हा एकदा शानदार पुनरागमन केले आहे. तो पूर्वीपेक्षा चांगला खेळाडू म्हणून उदयास आला आहे. मला वाटतं यावेळी तो खूप चांगली कामगिरी करेल. याशिवाय जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलियन परिस्थितीमध्ये किंवा सर्व प्रकारच्या परिस्थितीत अतिशय धोकादायक गोलंदाज आहे. तो ऑस्ट्रेलियात खूप प्रभावशाली असणार आहे. या दोन खेळाडूंसाठी ही मालिका चांगली झाली तर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढू शकतात”.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे आहे.

हेही वाचा-

ind vs ban; मयंक यादवनंतर आता या भारतीय गोलंदाजाची पाळी, दुसऱ्या टी20 मध्ये पदार्पण करणार का?
WTC इतिहासात अशी कामगिरी करणारा जो रुट पहिलाच, टाॅप-10 मध्ये रोहित शर्मा एकमेव भारतीय
शाकिबनंतर आता हा अनुभवी क्रिकेटपटू निवृत्तीच्या वाटेवर; भारताविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---